शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

३१डिसेंबरच्या उत्साहाला नियमांचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST

कोल्हापूर यंदाची वर्षअखेर ही कोरोनाच्या सावटाखाली असून त्यावर विविध नियमांचे बंधन असल्याचे चित्र आहे. परंतु ...

कोल्हापूर यंदाची वर्षअखेर ही कोरोनाच्या सावटाखाली असून त्यावर विविध नियमांचे बंधन असल्याचे चित्र आहे. परंतु तरीही नागरिकांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या परीने जय्यत तयारी सुरू केली आहे.

शासकीय नियमाप्रमाणे रात्री ११ पर्यंत हॉटेल्स सुरू राहणार आहेत. त्यामुळे हॉटेल्सनीही विद्युत रोषणाई केली असून ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. मात्र त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत रस्त्यांवर फिरताना नियमभंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

कोल्हापुरात उद्यानांमध्ये रात्री जेवायला जाण्याची पद्धत आहे; पण यंदा ही उद्याने बंद ठेवायची की उघडी याचा काहीच निर्णय झालेला नाही. तसेच उघड्यावर जेवायला जाण्यावरही मर्यादा येणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गच्चीवर आणि घरीच थांबून नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अनेकांनी बुधवारपासून तयारीला सुरुवात केली आहे. शीतपेयांच्या खरेदीपासून मिसळ, पावभाजी आणि भोजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र आहे. वर्षअखेरीच्या निमित्ताने हॉटेल्सनी अनेक आकर्षक पॅकेजीस जाहीर केली आहेत. घरगुती बिर्याणीचीही मागणी वाढली आहे. कोरोनामुळे गेले नऊ महिने हवालदिल झालेल्या नागरिकांना वर्षबदलाची आलेली ही संधी दिलासा देणारी ठरणार आहे.