शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात आरएसएसचे संचलन

By admin | Updated: October 13, 2016 02:09 IST

३५० स्वयंसेवकांची उपस्थिती : चंद्रकांतदादा पाटील यांचा सहभाग

कोल्हापूर/कसबा बावडा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथेप्रमाणे दसऱ्यानिमित्त मंगळवारी सकाळी संचलन करण्यात आले. कसबा बावडा परिसरात हातात दंड घेऊन झालेले संचलन औत्सुक्याचा विषय ठरले. राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील या संचलनामध्ये सहभागी झाले होते. पॅव्हेलियन मैदानावर सर्व स्वयंसेवक एकत्र आले. यानंतर भगवा ध्वज लावण्यात आला. प्रार्थनेनंतर संचलनाला सुरुवात झाली. ड्रम, ढोल, बासरी आणि बिगुलाच्या घोषामध्ये खांद्यावर दंड घेऊन स्वयंसेवक संचलनामध्ये सहभागी झाले होते. ठिकठिकाणी स्वागतासाठी रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. तसेच स्वयंसेवक व भगव्या ध्वजावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. अनेक ठिकाणी फटाकेही फोडण्यात आले. बलभीम गल्ली, रणदिवे गल्ली, चौगुले गल्ली, लाईन बझार, नवीन न्यायसंकुलासमोरून पुन्हा पॅव्हेलियन मैदानावर या संचलनाचा समारोप झाला. शहर संघटक डॉ. सुकिरण वाघ, विभाग संघचालक आप्पा दड्डीकर, विभाग कार्यकारिणी सदस्य भाई येसणे, जिल्हा कार्यवाह केदार जोशी यांच्यासह सुमारे ३५० स्वयंसेवक संचलनामध्ये सहभागी झाले होते. (प्रतिनिधी )हाफ पँटमधून फुल्ल पँटराष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे खाकी हाफ पॅँट, पांढरा शर्ट आणि डोक्यावर काळी टोपी असा स्वयंसेवकाचा पेहराव डोळ्यांसमोर येतो. यंदा प्रथमच हाफ पॅँटमधून फुल्ल पॅँटमध्ये येण्याचा निर्णय संघाने घेतल्याने फुल्ल पॅँट घातलेले स्वयंसेवक या संचलनामध्ये सहभागी झाले होते. स्वयंसेवक चंद्रकांतदादा राज्याचे महसूलमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील गणवेशामध्ये या संचलनामध्ये सहभागी झाले होते. एक स्वयंसेवक या नात्याने चंद्रकांतदादांनी संचलनामध्ये सहभाग घेतला. चंद्रकांतदादा या गणवेशामध्ये कसबा बावडा परिसरातून संचलन करीत असताना नागरिकांना याचे मोठे औत्सुक्य असल्याचे जाणवले. दसऱ्यानिमित्त कसबा बावडा परिसरातून मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने संचलन करण्यात आले. यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील सहभागी झाले होते.