शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शाही दसरा उत्साहात!

By admin | Updated: October 12, 2016 06:29 IST

आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार..घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी

कोल्हापूर : आपला विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार..घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीर निवासिनी अंबाबाई आणि तुळजाभवानी, कोल्हापूर संस्थानचे श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, युवराज यांच्या पारंपरिक वेषातील उपस्थिती, आरतीनंतर बंदुकीच्या फैरी झाडून देवीला दिलेली सलामी, आकर्षक आतषबाजी अशा नयनरम्य वातावरणात कोल्हापूरचा ऐतिहासिक दसरा पार पडला. दसरा चौकातील या प्रमुख सोहळ््यात झालेल्या शाही सीमोल्लंघनाने करवीरवासीयांच्या डोळ््याचे पारणे फिटले. त्यानंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व आबालवृद्धांनी एकमेकांना आपट्याची पाने देऊन ‘‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’’ अशा शुभेच्छा देत सोने लुटले.कोल्हापूरचा शाही दसरा म्हणजे देशवासीयांचे आकर्षण. संस्थान खालसा झाले असले तरी येथील संस्थानकालीन परंपरा आजही सुरू असून त्यातला महत्त्वाचा उत्सव म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव. त्याची सांगता दसरा चौकात सोने लुटून होते. त्यासाठी संध्याकाळी पाच वाजता अंबाबाई आण तुळजाभवानी देवीच्या पालख्यांनी लव्याजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान ठेवले. दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, बाळराजे शहाजीराजे, यौवराज यशराजे यांचे मेबॅक कारमधून सोहळास्थळी आगमन झाले. त्यानंतर पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती झाल्यानंतर सहा वाजून बारा मिनिटांनी बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ््याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले.छत्रपतींनी मेबॅक कारमध्ये उभे राहून कोल्हापूरकरांकडून सोने स्वीकारले. त्यानंतर जुना राजवाड्यात दसऱ्याचा दरबार भरविण्यात आला. अंबाबाईची पालखी आपल्या लव्याजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली. रात्री पालखी सोहळा संपन्न झाला. (प्रतिनिधी)