शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण संघर्ष समितीतर्फे २६ जूनला मुंबईत गोलमेज परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:18 IST

कोल्हापूर : राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनाची दिशा ...

कोल्हापूर : राज्य सरकारने आरक्षणप्रश्नी आणि विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत दि. २५ जून रोजी मुंबईत राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषद होणार आहे. मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीने ही परिषद आयोजित केली आहे. त्यात मराठा समाजातील विविध संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत संघर्ष समितीने यापूर्वी गोलमेज परिषद घेऊन आंदोलन केले. त्यावर राज्य सरकारने दि. ९ ऑक्टोबर २०२० रोजी शासन आदेश काढला. मात्र, त्यातील मराठा समाजाच्या मागण्यांबाबतच्या एकाही निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलनाची दिशा गोलमेज परिषदेत ठरविण्यात येईल. या परिषदेचे ठिकाण, वेळ दि. १० जूनला जाहीर केली जाईल. आरक्षणाबाबत सुधारित याचिका दाखल करणे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी संस्थेसाठी प्रत्येकी दोन हजार कोटींची तरतूद करावी. ओबीसी प्रवर्गाप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क लागू करावे. आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या बांधवांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, आदी विविध १४ मागण्यांवर परिषदेत चर्चा केली जाणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले. या वेळी विजयसिंह महाडिक, भरत पाटील, भास्करराव जाधव, जयदीप शेळके, आदी उपस्थित होते.