शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘फेरमुल्यांकन’कडून रस्त्याची पाहणी

By admin | Updated: May 3, 2015 00:46 IST

पंधरा दिवसात अहवाल देणार : ‘युटीलिटी’ शिप्टींगचे पैसे वळते करणार : संतोषकुमार

कोल्हापूर : शहरात आय.आर.बी. कंपनीने कोल्हापुरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून तयार केलेल्या रस्त्यांची शनिवारी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक तथा फेरमूल्यांकन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांनी या आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह समितीतील सदस्यांनी दिवसभर पहाणी केली. या समितीने शाहू ,शिये, पुईखडी व कळंबा टोल नाका व रस्त्यांची पाहणी केली. हा पहाणी अहवाल १५ दिवसात राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे समितीच्या या अहवालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. आय.आर.बी.ने केलेले रस्ते फेरमूल्यांकनाची मागणी टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीसह लोकप्रतिनिधींनी केली होती. दरम्यान, आय.आर.बी.ने शहरात ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ (बीओटी) तत्त्वावर ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले. पण, हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा शहरवासीयांचा आरोप आहे. याप्रश्नी सातत्याने टोलविरोधी कृती समितीने रान उठविले. रस्त्यांसाठी टोल देण्यास विरोधही केला. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप सरकारने कोल्हापुरातील टोल कोणत्याही स्थितीत घालवू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने यापूर्वी या रस्त्यांसाठी त्रिसदस्य समिती नेमली होती. पण, या समितीने राज्य शासनाकडे दिलेला अहवाल गुलदस्त्यातच राहिला. दरम्यान, शहरातील रस्त्यांसंदर्भात सत्ताधारी भाजप सरकारने रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली. या समितीमध्ये कोल्हापूर आर्किटेक्टस अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक वास्तुविशारद राजेंद्र सावंत, समिती सदस्य वास्तुविशारद रामचंदानी, रस्ते विकास महामंडळाचे ओहोळ व साहाय्यक कार्यकारी संचालक प्रकाश खेमचंदानी यांचा समावेश आहे. शनिवारी संतोषकुमार यांच्यासमवेत आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता शिंदे, एन. आर. भांबुरे, मूल्यांकन करणाऱ्या एजन्सीचे अमित सणगर, आदी समिती सदस्यांनी शिये, शाहू, शिरोली या टोलनाक्यांवर तसेच महावीर उद्यान, कसबा बावड्याचा मुख्य रस्ता, ताराबाई पार्क येथील पितळी गणपती, सायबर चौक, शाहू मिल, लक्ष्मीपुरी-उमा टॉकीज रस्ता, दसरा चौक, रंकाळा रस्ता (डी मार्टशेजारील), रंकाळा टॉवर ते तांबट कमान, पुईखडी, कळंबा, रेसकोर्स नाका, आयसोलेशन हॉस्पिटल, राजेंद्रनगर रिंग रोड, राजाराम महाविद्यालय येथे पाहणी केली. यामध्ये भुयारी गटार, पदपथ, पथदिवे, रस्त्यांचा दर्जा यांची पाहणी केली. समिती सदस्य देणार १३ मेपर्यंत अहवाल कोल्हापुरात शनिवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक तथा फेरमूल्यांकन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांना समितीतील अन्य सदस्य व पुणे येथील या रस्त्याचे मूल्यांकन तपासण्यासाठी नेमलेली एजन्सी स्वतंत्र अहवाल देणार आहे. आज एकाच दिवशी पाहणी करून संतोषकुमार मुंबईला रवाना झाले. त्यांनी १३ मेपर्यंत या सदस्यांना अहवाल देण्याचे सांगितले आहे. नागरिकांची मतेही जाणून घेण्याची गरज शहरात समितीने रस्त्याची व टोलनाक्यांची पाहणी केली; पण तिने रस्त्यांसंदर्भात एकाही नागरिकाकडून मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसते. अगोदरच वादग्रस्ततेत अडकलेल्या या रस्ते प्रकल्पामुळे शहरवासीयांत संतापाची लाट आहे. त्यामुळे समितीने रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल शनिवारी नागरिकांची मतेही जाणून घेणे गरजेचे होते.