शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

ऋषितुल्य तपस्वी जीवनलाल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:08 IST

इंद्रजित देशमुख एखादा माणूस वयाची ८५ वर्षे पूर्ण केली तरी समाजस्वास्थ्यासाठी झटत राहतो. सर्वसामान्यांना आरोग्याच्या संदर्भात सदैव जागृत राहण्यासाठी ...

इंद्रजित देशमुखएखादा माणूस वयाची ८५ वर्षे पूर्ण केली तरी समाजस्वास्थ्यासाठी झटत राहतो. सर्वसामान्यांना आरोग्याच्या संदर्भात सदैव जागृत राहण्यासाठी लेखन, समुपदेशन व वैद्यकीय आणि आहारविषयक सल्ला देऊन त्यांचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा ठेवत नाही. अशा ऋषितुल्य तपस्वी, तेजस्वी व तत्पर माणसाचे नाव आहे डॉ. जीवनलाल गांधी.आज डॉक्टर म्हटलं की, किमान ५०० रुपये खर्च हे गृहीत धरले जाते; पण डॉ. गांधी याला अपवाद आहेत. आपल्याकडे आलेला रुग्ण अल्पोपाहार व सरबत घेऊन गेला पाहिजे हा त्यांचा आग्रह असतो. आपण आपला आहार नीट घेतला, प्रसंगी उपवास केला, निसर्गाच्या सहवासात राहिलात, हंगामी फळांचा वापर केल्यास आरोग्य सुरक्षित राहू शकते, असा मोलाचा उपाय ते सांगतात. नुसता सांगून थांबत नाहीत, तर तो उपाय ते स्वत:ही उपयोगात आणतात.‘प्रकृती बिघडल्यास आपला आहार कारणीभूत आहे व त्यावर नियंत्रण ठेवलं तर प्रकृती ठणठणीत राहू शकते’, हा त्यांचा गुरुमंत्र. कोणतेही औषध न घेता आजार केवळ आहाराच्या जोरावर बरा करणारा हा ‘देवमाणूस’ आहे, यात वाद नाही. डॉ. गांधी हे डोंगरे महाराज, रामसुखदासजी महाराज, विद्यासागरजी, महर्षी महेशयोगी, श्री श्री रविशंकर अशा थोर व्यक्तींच्या सहवासात राहिले. त्यांचा बराचसा काळ परदेशातही गेला, पण...‘‘घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी’’या न्यायाने ते विदर्भातील अमरावतीला परतले. त्यांनी याही वयात जो ज्ञानआरोग्य यज्ञ प्रारंभलेला आहे, तो अनेकांना जीवनामृत देणारा आहे. डॉक्टरांचा जन्म सावरगाव नेहू (जि. बुलडाणा) येथे ५ आॅक्टोबर १९३३ रोजी झाला. सावरगाव नेहू हे निसर्गसांैदर्याने नटलेले गाव. गाव दोन्हींकडून नदीने वेढलेले असल्याने त्याकाळी पावसाळ्यात आवागमन शक्य नव्हते.त्यांचे प्राथमिक शिक्षण सावरगाव नेहू येथे झाले, तर पाचवी ते अकरावीपर्यंत गव्हर्न्मेंट हायस्कूल, अकोला व इंटर सायन्स विदर्भ महाविद्यालय, अमरावती येथे झाले. वैद्यकीय शिक्षण एमएफएएम (अ‍ॅलोपॅथी व आयुर्वेदिक) हा इंटिग्रेटेड कोर्स त्यांनी केला. एमबीबीएसचे अ‍ॅडमिशन सोडून आयुर्वेद व अ‍ॅलोपॅथी हा संयुक्त कोर्स त्यांनी हेतूपुरस्सर पूर्ण केला.योगाभ्यासासाठी ते डॉक्टर स्वामी शिवानंद सरस्वती, ऋषीकेश (उत्तर प्रदेश) येथील योगाश्रममध्ये सहा महिने राहिले. निसर्गोपचार प्रशिक्षण त्यांनी प्राकृतिक चिकित्सालय, हैदराबाद येथे डॉ. बी वेंकट राव यांच्या मार्गदर्शनात पूर्ण केले. प्रारंभी त्यांनी मलकापूर (विदर्भ) येथे अ‍ॅलोपॅथिक प्रॅक्टिस केली. नंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस सोडून योग व निसर्गोपचारद्वारे चिकित्सा सेवेचे क्षेत्र निवडले. त्यांना असे अनुभवाला आले की, दीर्घकालीन व्याधीच्या रुग्णांना अ‍ॅलोपॅथिक उपचाराने काही काळ लाभ मिळतो, परंतु तोच आजार कालांतराने पुन्हा होऊन रुग्णाचे देहावसान होते. चिरंतन लाभ देणाऱ्या योग व निसर्गोपचाराची कास धरली. परदेशात निसर्गोपचार शिकून आल्यानंतर कमला आरोग्य मंदिर, यवतमाळ व अकोला येथे काशीबाई कोठारी आरोग्य आश्रम येथे त्यांनी प्रमुख चिकित्सक या पदावर कार्य केले.स्वित्झर्लंड येथे नॅचरोपॅथी योग व आयुर्वेद येथे संशोधन व प्रमुख चिकित्सक आणि प्रशिक्षक या नात्याने सहा वर्षे कार्य केले. या काळात योग, निसर्गोपचार व आयुर्वेद उपचार, प्रचार व संशोधनाचे कार्य अमेरिका, जर्मनी, हॉलंड या देशांत केले. स्वास्थ्य साधन केंद्र जोधपूर व महावीर जैन यांचे प्रमुख धार्मिक स्थळ, राजस्थान येथे वरिष्ठ प्रमुख चिकित्सक म्हणून अनेक वर्षे कार्य केले. स्वस्थ जीवनशैली, स्ट्रेस मॅनेजमेंट, नैसर्गिक आहार, योगाभ्यास, निसर्गोपचार यांबाबत अनेक सामाजिक संस्था, शाळा, कॉलेज, तसेच रेडिओ व टीव्हीवर भाषणे, इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभाग व वक्ता म्हणून कार्य केले.हिंदी भाषेत विविध दैनिकांमध्ये त्यांनी लिखाण केले. योग निसर्गोपचारावरील कुटुंब स्वास्थ्य व कल्याण मंत्रालय, भारत सरकार, दिल्लीद्वारे पुरस्कृत व प्रशंसाप्राप्त ‘स्वास्थ्य सबके लिये’ पुस्तकाचे लेखक, मराठीतील पुस्तक ‘आरोग्यम् धनसंपदा’ नावे शब्दजा प्रकाशन, अमरावती येथून प्रकाशित तसेच ‘आहार हेच औषध’ हे प्रकाशनाच्या मार्गावर आहे.उतारवय असल्याने डॉ. गांधी अमरावती येथे वास्तव्यास आले. येथे त्यांचा ‘प्रयास - सेवांकुर’चे डॉ. अविनाश सावजी यांच्याशी परिचय झाला. डॉ. सावजींची समाजातील वंचित घटकांसाठी नि:स्वार्थ सेवा बघून त्यांनी सोबत काम करण्याचे ठरविले. यातूनच किडनीग्रस्त व निराश रुग्णांसाठी योग निसर्गोपचार व आहारद्वारे उपचाराचा प्रयोग करण्याचे ठरविले. यासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांसाठी अमरावती येथे निवासी शिबिरांचे आयोजन करून त्यात डॉ. गांधी १२ ते १४ तास मार्गदर्शन करतआणि त्यांच्या अर्धांगिनी स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळत.ते म्हणतात की, माझे वय ८७ वर्षांचे झाल्याने मला वेळ कमी आहे आणि मला जे काही ज्ञान आहे ते जास्तीत जास्त लोकांना वाटायचे आहे. त्यासाठी त्यांचा लेखन प्रपंच तसेच प्रत्यक्ष व दूरध्वनीवरून सेवा व मार्गदर्शन अविरतपणे सुरू आहे.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)