शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्यावर जल्लोषाचा ताल...लहानांबरोबर मोठ्यांचीही धमाल !

By admin | Updated: April 20, 2015 00:26 IST

लोकमत ‘धमाल गल्ली’ कार्यक्रम; सायकलिंग, बॅडमिंटन, कथ्थक नृत्य, झुंबा डान्स, विटी-दांडू, दोरीवरच्या उड्या, आदी खेळांची रेलचेल

कोल्हापूर : लहानांसह पालकांनीही बालपणीच्या आठवणींना जणू त्या काळातच जावून उजाळा दिला. निमित्त होतं, रंकाळा जुना पदपथ येथे ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘धमाल गल्ली’चे. शाळकरी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनाही रविवारची सकाळ पर्वणीच ठरली. या कार्यक्रमात उपस्थितांनी मनसोक्त मौजमजा लुटली. रंकाळा जुना पदपथ उद्यानात मन मानेल अशी मस्ती करण्यास मुभा मिळाल्याने मुलांच्या आनंदाला उधाण आले होते. कधी नव्हे, तो पालकवर्गही या धमाल मस्तीत अगदी लहान मुलांप्रमाणेच सहभागी झाला होता. या गल्लीत अगदी पारंपरिक युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांसह विटी-दांडू, सायकलिंग, झुंबा डान्स, कथ्थक नृत्य, रस्सीखेच, दोरी उड्या, काचेच्या गोट्यांचा खेळ, जिबली अर्थात लंगडी घालण्याचा खेळ, माऊथ आॅरगन, हास्य, योगासने, व्हायोलियन वादन, तबलावादन, सोलो परफॉर्मन्स, गिटारवादन, पथनाट्य, टॅटू काढणे, रांगोळी अशा एक ना अनेक गमती-जमती व विस्मृतीत गेलेल्या अनेक खेळांचा स्वर्गीय आनंद उपस्थितांनी लुटला. या ‘धमाल गल्ली’ची सुरुवात वेदा सोनुले यांच्या व्यंकटेश स्तोत्राने झाली. नृत्यचंद्रिका संयोगीता पाटील हिने ‘गणेशवंदना’ सादर केली. सार्थक क्रिएशनने छत्रपती शिवरायांवर आधारित ‘हे राजे’ हे नृत्य सादर करत उपस्थितांची वाहव्वा मिळवली. तत्पूर्वी, लोकमत ‘धमाल गल्ली’ या कार्यक्रमाचे शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व स्थायी समिती सभापती आदिल फरास यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, सहायक सरव्यवस्थापक (रेस) संजय पाटील, इव्हेंट व्यवस्थापक दीपक मनाठकर आदींची प्रमुख उपस्थिती होती, तर या कार्यक्रमाची सांगता वर्षा गुळवणी यांच्या पसायदानाने झाली. अक्षय डांगरे व विक्रम रेपे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. आणखी छायाचित्रे व वृत्त पान ८ वर