शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारित) पहिली पत्नी असतानाही दुसरा विवाह करून २९ लाखाला गंडा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पहिल्या लग्नाची माहिती लपवून मुलीस प्रेमसंबंधात अडकवून तिच्याशी विवाह करून तिला व तिच्या आईला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पहिल्या लग्नाची माहिती लपवून मुलीस प्रेमसंबंधात अडकवून तिच्याशी विवाह करून तिला व तिच्या आईला विविध कामाच्या निमित्ताने सुमारे २९ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घालून भामट्याने पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी गूळ व्यावसायिक, संशयित आरोपी विश्वनाथ शहाजी घाटगे (वय ३०, रा. वाघापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) याच्यावर रविवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. त्याने आपण साताऱ्यातील वजनदार लोकप्रतिनिधींचा भाचा असल्याचे सांगून हे कृत्य केल्याचे मुलीच्या नातेवाइकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वनाथ घाटगे याची पीडित मुलीशी ऑनलाईनने ओळख झाली. त्याने आपण साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचा भाचा असल्याचे मुलीला व तिच्या आईला भासवले. त्या मुलीशी प्रेमसंबंध जुळवून नंतर तिच्याशी विवाह केला. त्याने त्या मुलीशी आर.के. नगरमध्ये घर घेऊन काही दिवस संसार केला. त्यावेळी त्याने मुलीला आपला पहिला विवाह झाल्याची माहिती दिली. त्यामुळे मुलीला व तिच्या आईला धक्काच बसला. ही घटना मार्च २०२० ते आतापर्यंत घडली. दरम्यानच्या कालावधीत त्याने मुलगी व तिच्या आईकडून गुळाच्या फॅक्टरीसाठी सहा लाख रुपये, घरखर्चासाठी दोन लाख रुपये फोन पेवरून घेतले. दिल्लीला कारखान्याचे सामान आणण्यास जाण्यासाठी म्हणून दोन वेळा ५० हजार रुपये, प्लॉट खरेदीसाठी १० लाख रुपये, आदी विविध कामांसाठी असे एकूण २९ लाख २५ हजार रुपये घेऊन त्याने फसवणूक केली आहे, अशी फिर्याद मुलीच्या आईने रविवारी करवीर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून विश्वनाथ घाटगे याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.