शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

महसूलचा महापालिकेला पुन्हा दणका; कुरघोड्यांचे राजकारण

By admin | Updated: September 15, 2014 00:36 IST

कर्मचाऱ्यांसह वाहनताफा घेणार दिमतीला : महापालिकेतील नव्वद टक्के वाहनाचा ताफा मागवला

कोल्हापूर : महसूल विभागाने लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेच्या निवडणूक कामासाठी महापालिकेतील उपलब्ध ३५हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांची मागणी केली आहे. महापालिकेतील ९०टक्के वाहनांचा ताफाही महसूलच्या दिमतीला मागितला आहे. फौजदारी गुन्ह्याची भीती दाखवत महसूलने महापालिकेवर कुरघोडी केल्याची भावना व्यक्त होत आहे. अतिरिक्त कर्मचारी नसल्याने याचा महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.महापालिकेत विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत यावर्षीच्या महसूल उत्पन्नात मोठी तूट येण्याची भीती लेखा विभागाने व्यक्त केली आहे. स्थानिक संस्था कर, घरफाळा, परवाना, पाणीपट्टी या विभागांना ‘अलर्ट’ राहण्याच्या सूचना आयुक्तांनी यापूर्वीच दिल्या आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाल्याने मोठ्या प्रमाणात पुन्हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना या कामासाठी जुंपले जाणार आहे. याची धास्ती अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.आचारसंहिता लागू होताच महापालिकेचे दोन्ही उपायुक्त, दोन्ही सहायक आयुक्त, चारपैकी तीन शहर उपअभियंता, सर्वच्या सर्व कनिष्ठ अभियंता, सर्व सर्व्हेअर, मुख्य आरोग्य निरीक्षक, कार्यालयीन अधीक्षक ७, वरिष्ठ लिपिक २५ व शिपाई १० असे तब्बल ८०हून अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बीएलओ कामासाठी २४० हून अधिक कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात करण्याचे फर्मान आले आहे. महापालिकेतील आयुक्तानंतरची सर्व फळी निवडणुकीच्या कामात पुन्हा गुंतवली जाणार आहे. परिणामी महापालिकेचे दैनंदिन कामकाज मोठ्या प्रमाणात खोळंबणार आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. कार्यालयीन खोळंब्यामुळे नागरिकांच्या रोषास महापालिकेला सामोरे जावे लागणार आहे. (प्रतिनिधी)उपायुक्त २सहायक आयुक्त २उपशहर अभियंता ३सहा.व कनिष्ठ अभियंता १८सर्व्हेअर - ६मुख्य आरोग्य निरीक्षक - १आरोग्य निरीक्षक- ४अधीक्षक- ७लिपिक- २५शिपाई-१०महसूलचा शिपाईही चारचाकीतूनमागील वेळी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने महसूलच्या शिपायांनी टपाल वाटपासाठी वापरल्याची उदाहरणे आहेत. महसूलचे कर्मचारी ‘इलेक्शन’च्या नावाखाली झेरॉक्स आणायलाही चारचाकीचा वापर करताना दिसतात. यंदा पोलिसांच्या वाहतुकीसाठीही महापालिकेची वाहने वापरली जाणार आहेत. वाहनांची दुरवस्थाअतिरिक्त म्हणून घेतलेली महापालिकेची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झाडाखाली धूळ खात पडतात. इतर वाहनेही दिवसभर वापरून, रात्री वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उघड्यावरच थांबून असतात. ही वाहने धुवायची म्हटली तर तेथे पाण्याची सोय नाही. या वाहनांना अवकळा येते. टाकी भरून दिलेली डिझेल वाहने परत करताना जेमतेम दोन-तीन लिटरच डिझेल भरून परत केली जातात.वाहनांची दुरवस्थाअतिरिक्त म्हणून घेतलेली महापालिकेची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झाडाखाली धूळ खात पडतात. इतर वाहनेही दिवसभर वापरून, रात्री वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उघड्यावरच थांबून असतात. ही वाहने धुवायची म्हटली तर तेथे पाण्याची सोय नाही. या वाहनांना अवकळा येते. टाकी भरून दिलेली डिझेल वाहने परत करताना जेमतेम दोन-तीन लिटरच डिझेल भरून परत केली जातात.