शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नजरचुकीने दिलेले पन्नास हजार कामगारास परत

By admin | Updated: June 8, 2016 00:47 IST

प्रामाणिकपणाचे प्रत्यंतर : कदमवाडीतील सराफाचा सत्कार

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक येथे खड्याची अंगठी घेण्यासाठी आलेल्या तरुणाला नजरचुकीने दिलेले पन्नास हजार रुपये एका कामगाराचे असल्याचे मंगळवारी निष्पन्न झाले. सुनील भूपाल पोतदार (वय ३०, रा. बापूरामनगर, कळंबा) असे त्याचे नाव आहे. शाहूपुरी पोलिसांनी कदमवाडीतील सराफ अमोल विजय पवार यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करून सुनील पोतदार याला पन्नास हजार रुपये परत केले. नजरचुकीने दुसऱ्याला दिलेले पैसे परत मिळाल्याने सुनील भारावून गेला. अमोल पवार यांच्याकडे मध्यवर्ती बसस्थानक येथे अनोळखी तरुण पन्नास हजार रुपये देऊन गेला होता. खड्याची अंगठी व सोन्याचे तोडे घेण्यासाठी आलेल्या पवार यांना पैसे मिळाल्याने धक्काच बसला. पैसे कोणाचे, ते आपल्या हातात देऊन जाणारी व्यक्ती कोण? या विचाराने ते हैराण झाले. त्यांनी ते पन्नास हजार रुपये शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिले. पोतदारनेघरखर्चासाठी मित्राकडून उसने पैसे घेतले होते. मित्र बाहेरगावी गेल्याने त्याने त्याला ‘मध्यवर्ती बसस्थानक येथे मी एका तरुणाला पाठवितो त्याच्याकडे पैसे दे,’ असा निरोप दिला. त्यानुसार पोतदार बसस्थानक परिसरात येताच अमोल पवार अंगठी घेण्यासाठी याठिकाणी थांबले होते. मित्राने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे तीच व्यक्ती असेल असे समजून पोतदारने पन्नास हजार त्याच्याकडे दिले. दरम्यान,पोतदार याने मित्राला पैसे मिळाले का अशी फोनवरून विचारणा केली. त्याने नाही असे सांगितल्यावर पोतदार हडबडून गेले.नजरचुकीने पैसे दुसऱ्याच्याच हाती गेल्याने पोतदार कासावीस झाले.लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल रणजित देसाई त्याच्या ओळखीचे होते. त्यांनी याप्रकाराची माहिती त्यांना दिली. दरम्यान, या पैशाबाबत‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. देसाई यांनी शाहूपुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानक येथील सीसीटीव्ही फुटेज मिळविले. त्यामध्ये अमोल पवार व सुनील पोतदार यांच्यात पैशांची देवाण-घेवाण होतानाचे फुटेज पोलिसांना मिळाले. पोलिस निरीक्षक प्रवीण चौगले यांनी अमोल पवार व पोतदार यांना पोलिस ठाण्यात बोलावून सीसीटीव्ही फुटेज दाखविले. त्यांनी परस्परांना ओळखले. पोलिस निरीक्षक चौगले यांनी पवार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करून ते पैसे पोतदार याच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी) आपल्यासारखा त्रास दुसऱ्याला नको म्हणून...आजकाल रस्त्यात सापडलेले दहा रुपये गुपचूप खिशात घालण्याची प्रवृत्ती बळावत चालली असताना सहजपणे मिळालेले चक्क ५० हजार रुपये परत देण्याचे माणूसपण अमोल पवार यांनी दाखविले. काही दिवसांपूर्वी त्यांचेही असेच काही पैसे पडले होते. ते त्यांना परत मिळाले नाहीत. त्यावेळी त्यांना त्याचा खूप मनस्ताप झाला. मला ज्यांचे पैसे मिळाले, त्या व्यक्तीसही असाच मनस्ताप झाला असेल. आपल्या वाट्याला जे आले, ते त्यांना सहन करावे लागू नये, या भावनेने पवार यांनी स्वत: पोलिसांत जाऊन पैसे परत केले.