शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रतिसाद’चा गाशा गुंडाळला

By admin | Updated: August 13, 2014 00:35 IST

कंपनीचे निवेदन : म्हणे, पैसे परत देणार

कोल्हापूर : ‘तुम्ही फक्त सहा हजार रुपये भरून मेंबर व्हायचे, वर्षभर तुम्हाला म्हशीचे एक लिटर दूध घरपोच देणार,’ अशी जाहिरातबाजी करून सुरू झालेले ‘प्रतिसाद’ दूध अखेर बंद झाले आहे. अनियंत्रित वितरण व्यवस्थेला कंटाळून व असंख्य दबावामुळे दूध बंद करत असल्याचे निवेदन संबंधित साखळी योजनेच्या संयोजकांकडून प्रसिद्धीस देण्यात आले आहे. हे असेच होणार असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी दिले होते. दरम्यान, यासंदर्भात नेमकी वस्तुस्थिती जाण्यासाठी प्रतिसाद दुधाचे प्रमुख अमोल पोतदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. कोल्हापुरात सुमारे ५५० लोकांनी या साखळी योजनेत नोंदणी केल्याचे सांगण्यात येत होते. ही कंपनी बत्तीस शिराळा येथील फत्तेसिंहराव नाईक सहकारी दूध संघाकडून १७०० लिटर दूध घेत होती. परंतु त्यांनाही फसवणुकीचा अंदाज आल्यावर मार्चपासून त्यांनी दूध पुरवठा बंद केला. त्यानंतर येलूरजवळच्या एका दूध संघाकडून दूध घेतले जात होते. रीतसर ४३ रुपये ५० पैसे लिटरने दूध घेऊन ते ग्राहकांना १६ रुपये ६० पैशांने पुरविण्यात येत होते. नव्या वर्गणीदारांकडून पैसे घेऊन जुन्या वर्गणीदारांना दूध पुरवठा केला जात होता. आपण कोल्हापूरकराची सेवा करत आहोत, अशा स्वरूपाची मोठमोठी होर्डिंग्जही मध्यंतरी साऱ्या शहरभर लावली होती; परंतु तरीही योजनेस फारसा प्रतिसाद नव्हता. गेल्या चार दिवसांपासून उचगाव व अन्य परिसरातूनही लोकांच्या दूध मिळत नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. तोपर्यंत आज दूध बंदच करण्यात आल्याचे जाहीर केल्याने ग्राहकांतही गोंधळ उडाला. ज्यांचे पैसे द्यायचे आहेत ते घरपोच देणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. कंपनी महिलांकडून एक ‘इंडेम्निटी बाँड’ लिहून घेत असे. त्यानुसार सहा हजार रुपये भरून वर्षभर म्हशीचे एक लिटर दूध घरपोच पुरविले जाणार आहे. गायीच्या दुधासाठी पाच हजार रुपये घेतले जात होते.