शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

शिरगाव ग्रामसभेत डॉल्बी न लावण्याचा ठराव

By admin | Updated: August 17, 2016 00:29 IST

\लोकमत इनोशिटिव्ह

शिरगाव : शिरगाव (ता. राधानगरी) येथील ग्रामसभेत डॉल्बी न लावण्याचा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला. या ठरावावेळी ‘लोकमत’मध्ये आलेल्या बातमीचा उल्लेख करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजयसिंह गोविंदराव कलिकते होते. सभेसाठी तरुणांची मोठी गर्दी होती.मोठ्या संख्येने ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडली. ग्रामसेवकांनी या सभेवर बहिष्कार टाकल्याने शासकीय प्रतिनिधी म्हणून विद्यामंदिर शिरगावचे मुख्याध्यापक सुरेश पाटील यांनी काम पाहिले. अहवाल वाचन लिपिक सुरेश गौंड यांनी केले. सभेत गावच्या विकासावर अनेकांनी सूचना मांडल्या. सरपंच कलिकते यांनी या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन दिले.वैयक्तिक शौचालयासाठीची नावे, अपंग व्यक्तींना मदत, जमाखर्च, ताळेबंद, नळांना थेट पाणीपुरवठा, सार्वजनिक मुतारी, शौचालय, एका गल्लीतील विद्युत पोल, शासकीय योजनांच्या पाठपुरावा होत नसणे, तसेच क्रीडांगणाबाबत चर्चा झाली.यावेळी बाबूराव पाटील, सुनील चौगले, कृष्णात पाटील, अमर पाटील, राहुल चौगले, सुशांत पाटील, अजित पाटील, राजेंद्र व्हरकट, सुभाष नाईक, मानसिंग पाटील, मधुकर किरुळकर, माजी सरपंच डॉ. बाळासाहेब पोवार, सुरेश कलिकते, पी. ए. पाटील, धनाजीराव चरापले, बाबूराव चरापले, दिनकर चरापले, हणमंत चौगुले, नामदेव जाधव, बी. एस. पाटील, भीमराव चरापले, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना कलिकते यांनी उत्तरे दिली. महिन्याभरात पेयजल योजनेचे काम पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. तंटामुक्त अध्यक्षांच्या फेरनिवडीबाबत इच्छुकांच्या जास्त संख्येमुळे त्यांना कमिटीत घेऊन जुन्यानीच कारभार पाहण्याचे ठरले. सुरेश पाटील यांनी आभार मानले. पोलिस पाटील संजय कांबळे यांनी निवेदन केले. (प्रतिनिधी)