शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

चुकीची माहिती दिल्यावरून ‘विद्यापीठ विकास आघाडी’कडून सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST

कोल्हापूर : सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक संदिग्ध उत्तरे तसेच चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत विद्यापीठ ...

कोल्हापूर : सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने जाणीवपूर्वक संदिग्ध उत्तरे तसेच चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत विद्यापीठ विकास आघाडीने अधिसभेचा (सिनेट) बुधवारी त्याग केला.

परिनियमानुसार प्रश्न विचारूनही कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ते नाकारल्याचे कारण पुढे करत विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) प्रश्नोत्तरांच्या तासावर बहिष्कार टाकला. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. विविध अधिविभागांमधील राजकारण आणि वाद, विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या संघटनांना काही अधिकाऱ्यांकडून बळ मिळत असल्याच्या मुद्द्यावर या अधिसभेत वादळी चर्चा झाली.

विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात दुपारी बारा वाजता ही सभा सुरू झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के तर सचिवपदी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील होते.

‘विकास आघाडी’चे मधुकर पाटील यांनी विद्यापीठातील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली काय?, शिक्षण सहसंचालक कार्यालयात अद्याप किती वेतन निश्चिती प्रकरणे प्रलंबित आहेत? हे प्रश्न विचारले. अमरसिंह रजपूत यांनी विद्यापीठातील प्रत्येक अधिविभागातील राजकारण, वाद थांबवून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी उपप्रश्नातून केली. या प्रश्नांना कुलगुरू, कुलसचिव, सदस्य धैर्यशील पाटील यांनी उत्तरे दिली. त्यातच डॉ. एस. डी. डेळेकर यांनी वेतन निश्चितीच्या प्रकरणाचा मुद्दा मांडत प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याचे सांगितले. त्यावर सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रशासनाकडून संदिग्ध उत्तरे, चुकीची, दिशाभूल करणारी माहिती मिळत असल्याचे सांगत, एल. जी. जाधव यांनी हक्कभंग स्थगन प्रस्ताव सादर केला तसेच अधिसभा रद्दची मागणी केली. त्यावर प्रशासनाने कोणतीही खोटी माहिती दिलेली नाही, लेखी उत्तरे कागदपत्रांच्या आधारे दिली आहेत, दिशाभूल करण्याचा प्रश्न नसल्याचे सांगत कुलगुरूंनी स्थगन प्रस्ताव नाकारला. त्यावर ‘विकास आघाडी’च्या मधुकर पाटील, अमरसिंह रजपूत, भारती पाटील, संजय जाधव आदी सदस्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभागृहाबाहेर प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

दरम्यान, विहीत मुदतीत सादर केलेले प्रश्न नाकारण्याचे कारण ‘सुटा’ सदस्यांनी विचारले. पण, त्याबाबत चर्चा होणार नाही, असे कुलगुरूंनी सांगितले. त्यावर ‘सुटा’च्या अशोककुमार पाटील, इला जोगी, निलकंठ खंदारे, मनोज गुजर, राजेंद्र थोरात, अलका निकम यांनी प्रश्नोत्तरांच्या तासावर बहिष्कार टाकला. प्रश्नोत्तराच्या तासात विकास आघाडी, ‘सुटा’ने सभात्याग करण्याची घटना पहिल्यांदाच घडली.