शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा वाजली ‘आप्पां’ची शिट्टी

By admin | Updated: April 21, 2015 00:59 IST

राजाराम कारखाना निवडणूक : महाडिक यांच्या पॅनेलला सर्वच जागा

कसबा बावडा : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा बावड्यातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू पॅनेलने सर्व १९ जागा १०२ ते ३०२ अशा मताधिक्क्याने जिंकल्या. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात सोमवारी मतमोजणी झाली. सायंकाळी निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. आमदार महादेवराव महाडिक यांनी पाचव्यांदा कारखान्याची सत्ता काबीज करीत पुन्हा एकदा ‘शिट्टी’ वाजविली.कारखान्याच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत सरासरी ९० टक्के मतदान झाले होते. १२ हजार ६२४ सभासदांपैकी ११ हजार ३९५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सत्ताधारी राजर्षी शाहू पॅनेल आणि विरोधी राजर्षी शाहू ‘परिवर्तन’ पॅनेलचे मिळून ३८ जण रिंगणात होते. नव्या संचालक मंडळात १२ नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. पॅनेलप्रमुख आमदार महादेवराव महाडिक यांना संस्था गटात १२७ पैकी ९२ मते मिळाली. आमदार महाडिक यांच्या सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात माजी आमदार सतेज पाटील, विनय कोरे यांनी राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेल उभे केले होते. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. (पान २ वर)(पान १ वरून) संस्था गटाची प्रथम मतमोजणी करण्यात आली. काही वेळातच या गटातून महादेवराव महाडिक विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. याचवेळी अन्य इतर गटांच्या मतपत्रिकांची गटनिहाय विभागणी करण्यात आली. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मतपत्रिका विभागणीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर सर्वसाधारण गटाच्या मतपत्रिकेसह अन्य गटांच्या मतपत्रिका मोजण्यास सुरुवात झाली.यामध्ये १०० ते १५० मतांची आघाडी सत्तारूढ गटाला मिळाली. त्यामुळे दोन्ही गटांच्या उमेदवारांची तसेच कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढून राहिली. सायंकाळी सात वाजता सर्व निकाल घोषित करण्यात आले. विजयी व पराभूत उमेदवारांत १०२ ते ३०२ मतांचा फरक होता. निकालाच्या घोषणेनंतर महाडिकांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अशी : उत्पादक सभासद गट (शाहू पॅनेल) : आनंदा तोडकर (५५३५), वसंत बनाडे (५३१९), सिद्धू नरबळ (५४९९), अमल महाडिक (५६५३), सर्जेराव माने (५४०२), यशवंत जाधव (५६६५), प्रशांत तेलवेकर (५५६१), दिलीप पाटील (५५७३), पंडित पाटील (५५०७), दिलीप उलपे (५६०१), हरीष चौगले (५५०३), कुंडलिक चरापले (५६५५), राजाराम मोरे (५४२७).संस्था सभासद गट : महादेवराव महाडिक (९२).अनुसूचित जातीजमाती : केशव कांबळे (५५६४).महिला सदस्या : कल्पना किडगांवकर (५६६३), कल्पना पाटील (५७२२).इतर मागासवर्गीय : पांडुरंग पाटील (५६३१).भटक्या विमुक्त जाती : बिरदेव तानगे (५६३०).पराभूत उमेदवार व त्यांना पडलेली मते : उत्पादक सभासद गट (शाहू परिवर्तन पॅनेल) : बाबुराव बेनाडे (५३१९), किरण भोसले (५१९८), शिवाजी किबिले (५२०१), तानाजी चव्हाण (५१०१), संभाजी पाटील (५२३३), शिवाजी चौगले (५३२२), अजित पाटील (५२३४), महादेव पाटील (५३०५), राजकुमार पाटील (५२४८), विश्वास नेजदार (५३४७), विद्यानंद जामदार (५१७२), महिपती खडके (५२५५), बापूसोा पाटील (५२०७).संस्था गट : सखाराम चव्हाण (३४).अनुसूचित जातीजमाती : बाबासोा देशमुख (५४६२).महिला सदस्या : मालिनी पाटील(५४९९), रंजना पाटील (५२६१).इतर मागासवर्गीय : विजयकुमार चौगले (५३२२).भटक्या विमुक्त : आण्णा रामाण्णा धनगर (५३८२).या निवडणुकीत माजी अध्यक्ष विश्वास नेजदार हे प्रमुख उमेदवार पराभूत झाले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पोवार, सहायक अधिकारी डॉ. योगेश खरमाटे व धनंजय पाटील यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)या निकालाने एक नवी दिशा दिली आहे. विरोधकांनी पातळी सोडून टीका केली. मात्र, आम्ही आमची पायरी सोडली नाही. महाडिक घराण्याला संस्कृती आहे. जनता सुज्ञ आहे. त्यांना नफा-नुकसान समजते. कोल्हापूरच्या जनतेने आमच्यावर जबरदस्त प्रेम केले आहे. सलग २१ वर्षे व पाचव्यांदा ‘राजाराम’ची सत्ता देणाऱ्या जनतेस मानाचा मुजरा करतो.- आ. महादेवराव महाडिक( सत्तारूढ पॅनलचे नेते) जे कारखान्याचे मतदारच नाहीत, अशा बोगस मतांच्या जोरावर सत्तारूढ पॅनेल विजयी झाले परंतु कारखान्याचा खरा उत्पादक शेतकरी हा माझ्या मागे असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे माझ्या पॅनेलचा हा पराभव तांत्रिक स्वरुपाचा आहे. ज्यांनी या लढाईत मला पाठबळ दिले, त्यांचा मनापासून आभारी आहे. ही लढाई एका पराभवाने थांबणारी नाही.- सतेज पाटील (विरोधी राजर्षी शाहू परिवर्तन पॅनेलचे नेते)