शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उर्वरित काम प्राधिकरण करणार

By admin | Updated: May 13, 2016 00:53 IST

सांगली-कोल्हापूर रस्ता : टोलबाबत संभ्रम; मूल्यमापनाची जबाबदारी ‘सार्वजनिक बांधकाम’कडे

कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाल्याने कोल्हापूर-सांगली रस्त्याचे उर्वरित काम गतीने होणार आहे. प्राधिकरण शिल्लक कामांसह पूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण करणार आहे. झालेल्या कामाचे मूल्यमापन करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. मूल्यमापनानंतर शासनाकडून पैसे दिल्यानंतर ठेकेदार सुप्रीम कंपनीला बाजूला करण्यात येणार येईल. दरम्यान, त्या रस्त्यावरील टोल जाणार की चालू राहणार याबद्दल सध्या संभ्रमावस्था आहे. कोल्हापूर-सांगली या रस्त्याची एकूण लांबी ५२.६१ किलोमीटर असून, हा रस्ता ‘बांधा, वापरा, हस्तातंरित करा’ या तत्त्वावर करण्याचा ठेका सुप्रीम कंपनीला दिला, परंतु करारातील नियमानुसार मुदतीमध्ये कंपनीने रस्ता पूर्ण केला नाही. रस्ताकामाच्या दर्जाबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुप्रीम कंपनीच्या ठेक्यातील मूळ आराखड्यात रस्त्याचा काही भाग दुपदरीकरणाचा आहे. मात्र, आता महामार्ग प्राधिकरणाकडे गेल्यामुळे पूर्ण रस्त्याचे चौपदरीकरण होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठी पुन्हा भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. हा रस्ता प्राधिकरणाकडे रीतसर सुपूर्द केल्यानंतर काम गतीने होणार आहे, हा वाहनधारकांच्या दृष्टीने फायद्याचा भाग आता समोर आला आहे. मात्र, टोल राहणार की जाणार याबद्दल प्रचंड कुतूहल आहे.त्याबाबत राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही. टोल वसूल होणार नाही, टोलचा झोल वाढेल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच ते ठरविणार, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर टोलचा विषय समोर आणला जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)माहिती देतानाही भीती...प्राधिकरणाकडे रस्ता सोपविल्याने कंपनी काय करणार, अशी सुप्रीम कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडे ‘लोकमत’ने विचारणा केली. परंतु, ‘शासनाकडून अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. त्यामुळे आताच काही यावर बोलणार नाही,’ असे उत्तर मिळाले. बांधकाम विभागातील संबंधित अधिकारीही धाडसीपणे माहिती देण्यास तयार नाहीत. त्यामुळे माहिती जाहीरपणे न सांगण्याइतपत कोणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.