शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा प्रस्ताव पुन्हा महासभेसमोर ठेवू

By admin | Updated: December 9, 2015 01:57 IST

नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत

कोल्हापूर : वैभव हौसिंग सोसायटीसंदर्भात उच्च न्यायालयाने फटकारल्याबाबत राज्य शासनाकडून कोल्हापूर महानगरपालिकेस अद्याप कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही; त्यामुळे राज्य शासनाकडून विचारणा केल्यास त्या प्रस्तावावर पुन्हा महासभेत चर्चा घडवून तिचा अहवाल शासनाला पाठविणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या बरखास्तीबाबत फटकारल्याने शहरात खळबळ माजली आहे. दिवसभर याबाबत शहरात तसेच महानगरपालिकेत चर्चा रंगली होती. तसेच महापालिका अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात शिवाजी विद्यापीठालगतच्या वैभव सोसायटीजवळ रि. स. नं. १२८/३/५ सी हा पाच एकरांचा भूखंड प्रीती विजय मेनन यांच्या मालकीचा असून, १९९९ च्या विकास आराखड्यात हा भूखंड ‘शेतीजमीन तसेच ना-विकास क्षेत्र’ म्हणून आरक्षित दाखविला आहे. त्यामुळे हा भूखंड रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याची मेनन यांची मागणी महासभेने फेटाळली होती; पण त्यांनी याबाबत राज्य शासनाकडे दाद मागितली. शासनानेही महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून याबाबतचा प्रस्ताव पुन्हा पाठविला; पण महापालिकेने नियमानुसार १० टक्के भूखंड खुले क्षेत्र आणि अतिरिक्त १० टक्के भूखंड सुविधा क्षेत्रासाठी आरक्षित ठेवल्यास उर्वरित भूखंडाला रहिवासी क्षेत्रासाठी मान्यता देऊ, असे सांगितले; पण मेनन यांनी अतिरिक्त १० टक्के भूखंडच सोडण्यास नकार दिल्याने हा प्रस्ताव महासभेत फेटाळला होता. त्याबाबत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कोल्हापूर महानगरपालिकेबाबत राज्य शासनाला फटकारले. राज्य शासनाने आदेश देऊनही ते धाब्यावर बसविणारी कोल्हापूर महानगरपालिका बरखास्त का करीत नाही, अशी विचारणा राज्य शासनास केली. त्याबाबत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत यांनी उच्च न्यायालयाने राज्य शासनास फटकारल्याबाबत अद्याप महापालिकेस स्पष्टीकरण आले नसल्याचे सांगितले. तसेच शासनाकडून त्याबाबतचा आदेश आल्यास याचिकाकर्त्यांना जागा देण्याबाबतची प्राथमिक मंजुरी महासभेकडून घेतली जाईल. त्यानंतर या मंजुरीवर पुढील सात दिवसांत हरकती व सूचना घेऊन पुन्हा तो प्रस्ताव महासभेपुढे ठेवून सभेतील अहवाल राज्य शासनाकडे पाठवू, असेही ते म्हणाले. पण या सर्व प्रक्रियेसाठी किमान तीन महिने अवधी जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)