शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनासाठी जमिनीचा आजपासून शोध घेणार

By admin | Updated: April 20, 2015 00:23 IST

तीन तालुक्यांतील तलाठी, मंडल निरीक्षक, वन विभागाचे कर्मचारी शासकीय जमिनीची पाहणी करणार आहेत

कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसलेल्या चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लागणाऱ्या पर्यायी शासकीय जमिनीचा शोध आज, सोमवारपासून घेतला जाणार आहे. वन विभागाचे अधिकारी, तलाठी, मंडल निरीक्षक, अभयारण्यग्रस्तांचे प्रतिनिधी जमिनीची पाहणी करणार आहेत. गेल्या १६ मार्चपासून योग्य पुनर्वसनाच्या मागणीसाठी चांदोलीचे अभयारण्यग्रस्त बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. याची दखल घेऊन वन सचिव विकास खारगे यांनी पुनर्वसनासाठीच्या जमिनीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवारी दुपारी स्थानिक वन अधिकारी एन. ए. पाटील यांनी आंदोलकांच्या नेत्यांची भेट घेतली. आजपासून शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यांतील शासकीय जमिनीची पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुनर्वसनासाठी लागणारी जमीन व तीन तालुक्यांत किती शासकीय जमीन उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. तीन तालुक्यांतील तलाठी, मंडल निरीक्षक, वन विभागाचे कर्मचारी शासकीय जमिनीची पाहणी करणार आहेत. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष घालून स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना निश्चित कालमर्यादेत प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे; परंतु शासकीय आदेश होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे शुक्रवारी ३३ व्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. काही आंदोलक गावी गेले आहेत. (प्रतिनिधी)