शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वाजता सुरू होते नोंदणी; दोन मिनिटांत हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने दि. १ मेपासून पुढील सात ...

कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने दि. १ मेपासून पुढील सात दिवस प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले. या वयोगटांतील ११,८५२ नागरिकांचे सोमवार (दि. १०) पर्यंत लसीकरण झाले आहे. या गटांतील नागरिकांनी लस घेण्याच्या किमान एक दिवस आधी कोविन पोर्टल अथवा ॲॅपवर ऑनलाईन नोंदणी करून अपॉयमेंट घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार या वयोगटांतील नागरिक नोंदणीसह अपॉयमेंट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कधी सकाळी नऊ वाजता, कधी अकरा, कधी दुपारी एक, तर कधी पावणेचार वाजता या पोर्टलवर अपॉयमेंट घेण्याचा स्लॉट खुला होत आहे. पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, लसीकरणाचे केंद्र टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करेपर्यंत अवघ्या दोन ते तीन मिनिटांतच बुक्ड अशा संदेशासह अपॉयमेंट हाऊसफुल्ल झाल्याचे दाखवित आहे. काही नागरिकांनी रात्री अकरा, बारानंतर, तर काहींनी सकाळी सहा, सात वाजता वेगवेगळ्या वेळी ऑनलाईन अपॉयमेंट मिळविण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांना ती मिळालेली नाही. त्यामुळे लस घेण्याबाबतच्या अपॉयमेंट मिळविण्यासाठीचा मनस्ताप नागरिकांना होत आहे.

पॉंईटर

१८ ते ४४ वयोगटांतील किती जणांचे झाले लसीकरण : ११८५२

१८ते ४४ वयोगटांतील जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या : १८,५२,३६८

१८ ते ४४ वयोगटांतील लसीकरण झालेल्यांची टक्केवारी : एक टक्का

चौकट

सकाळी नऊ वाजता रहा तयार

केंद्रनिहाय उपलब्ध डोसची पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर अपॉयमेंटचा स्लॉट दिसतो. सर्वसाधारणपणे सकाळी नऊ वाजता स्लॉट खुला होतो. त्यामुळे यावेळेपासून नागरिकांनी लॉगीन व्हावे. मोबाईल क्रमांक नोंदविल्यानंतर शेड्युलमध्ये सेंटर निवडून अपॉयमेंट मिळविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.