शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबाबाई ’ ला पालकमंत्र्यांचा साष्टांग दंडवत- लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 18:40 IST

लोकसभा निवडणूकीत राज्यासह देशभरात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्नी अंजली यांच्यासमावेत गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास

कोल्हापूर : लोकसभा निवडणूकीत राज्यासह देशभरात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्नी अंजली यांच्यासमावेत गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास करवीर निवाासीनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी पाटील यांनी देवीला साष्टांग दंडवत घातला.

पालकमंत्री पाटील यांनी राज्यातील ४८ जागांवर भारतीय जनता पक्ष -शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याचा पण केला होता. त्यात त्यांना ४२ जागांवर अपेक्षित यश आले. या विजयाच्या प्रित्यार्थ गुरूवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी करवीर निवासीनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. मला असेच यश सदैव दे असे म्हणत देवीला साष्टांग दंडवत घातला. दर्शन घेवून आल्यानंतर पालकमंत्री पाटील म्हणाले, मी ज्या ज्यावेळी देवीकडे मागितले ते मला त्या त्या वेळी मिळत गेले आहे. मी प्रथम आमदार होतो, तेव्हा मी देवीचे दर्शन घेतल्याशिवाय घरी जात नव्हतो. मी देवीचा परमभक्त आहे.

या निवडणूकीतही मी भाजपाचे देशात सरकार येवू दे असे मागणे घातले होते. त्याप्रमाणे निवडणुकीचा निकाल आमच्या पक्षाच्या बाजूने लागला. त्यात मी अपेक्षित केलेले यश आले. त्यानूसार मी देवीच्या चरणी लीन होण्यासाठी आलो आहे. अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. तत्पुर्वी भाजपा कार्यकर्त्यांनी देशासह राज्यभरात लोकसभा निवडणूकीत अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ भारतीय जनता पक्षाच्या सबजेल जवळील कार्यालयासमोर गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला. यात कार्यकर्त्यांसह पदाधिकारीही सहभागी झाले होते.

यावेळी राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपाचे जिल्हाअध्यक्ष संदीप देसाई, गोकूळचे संचालक बाबा देसाई, अशोक देसाई, राहूल चिकोडे, अ‍ॅड. संपतराव पवार, माणिक पाटील चुयेकर, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, अजित ठाणेकर, दिग्विजय कालेकर, तुषार देसाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीत भाजपाला राज्यासह देशभरात अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरची करवीरनिवासीनी अंबाबाई देवीच्या चरणी साष्टांग दंडवत घातला. यावेळी त्यांच्या समावेत पत्नी अंजली व देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते. लोकसभा निवडणूकीत भाजपाला राज्यासह देशभरात अपेक्षित यश मिळाल्याच्या प्रित्यार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरची करवीरनिवासीनी अंबाबाई देवीचे पत्नी अंजली यांच्या समावेत गुरूवारी सायंकाळी दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.लोकसभा निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल गुरूवारी भाजपा कार्यकर्त्यांनी सबजेल परिसरातील कार्यालयासमोर गुलाल उधळून जल्लोष केला. यात एक मुस्लिम कार्यकर्त्यानेही नृत्यावर ठेका धरला.लोकसभा निवडणूकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल गुरूवारी भाजपा कार्यकर्त्यांनी सबजेल परिसरातील कार्यालयासमोर गुलाल उधळून व नृत्यावर ठेका धरत आनंद द्विगुणीत केला. यात भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नगरसेवक अजित ठाणेकर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapur-pcकोल्हापूर