शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

मंदीमुळे रेडिरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवा

By admin | Updated: December 15, 2014 23:59 IST

शासनाकडे प्रस्ताव : दर वाढल्यास बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत येण्याची शक्यता

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकांसह नव्याने स्थावर मालमत्ता खरेदीच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना नवीन वर्षातील बाजारमूल्य दर तक्त्या (रेडिरेकनर)च्या वाढीचे वेध लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे ३१ डिसेंबरला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी संपूर्ण राज्याचा नवा रेडिरेकनर तक्ता जाहीर करतील. याचा १ जानेवारीपासून तत्काळ अंमल होईल. यावर्षी रेडिरेकनर वाढीमुळे शहरातील जागेच्या दरात सरासरी दहा हजार रुपये प्रती चौरस मीटरपर्यंतची वाढ होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मंदीमुळे यावर्षी रेडिरेकनरचा दर ‘जैसे थे’ ठेवावा, अशी विनंती राज्य शासनाकडे केली असल्याची माहिती जिल्हा मुद्रांक अधिकारी पी. डी. शेळके यांनी ‘लोकमत’ला दिली. मागील वर्षी वाढलेल्या रेडिरेकनरमुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महालक्ष्मी मंदिर, गुजरी परिसर, भाऊसिंगजी रोड परिसर, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, राजारामपुरी परिसरातील जागेच्या दरात मोठी वाढ झाली.२० ते २६ हजारांपर्यंत असलेल्या दरासाठी २७ ते ४० हजारांपर्यंत रक्कम मोजावी लागली. झोपडपट्टीसह उपनगरांतील परिसरात यापूर्वी खुल्या जागेसाठी ७०० रुपये असणारा दर १२०० रुपये झाला, तर बांधकाम क्षेत्रासाठी हाच दर १० हजारांवरून १२ हजारांपर्यंत झाला. रेडिरेकनरच्या वाढीमुळे मरगळलेला बांधकाम व्यवसाय आणखी अडचणीत आला. यावर्षी पुन्हा रेडिरेकनरची दरवाढ झाल्यास घरासह जागेच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी स्वप्नातीलच घर आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)नव्या दराचा १ जानेवारीपासून अंमल होणार आहे. ३१ डिसेंबरअखेर खरेदी केलेल्या मुद्रांकावर व्यवहाराचा तपशील लिहून सही केलेला मुद्रांक जुन्या रेडिरेकनर दरानेच ३० एप्रिल २०१५ पर्यंत चालणार आहे. तसेच मंदीमुळे नव्याने दरवाढ करू नये, अशी विनंती शासनाला केली आहे. - पी. डी. शेळके (जिल्हा मुद्रांक अधिकारी)यापूर्वी शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. मंदीमुळे अगोदरच सर्वच स्थावर व्यवहारांवर मर्यादा आल्या आहेत. नव्याने दरवाढ झाल्यास व्यवहारावर आणखी परिणाम होऊन व्यवहार कमी होण्याची शक्यता आहे.- अ‍ॅड. जीवन पाटीलरेडिरेकनरच्या वाढीमुळे जागेसह घरांच्या किमती, घरफाळा, सेल्स टॅक्स, स्टॅम्प ड्यूटी, मुद्रांक नोंदणीतही वाढ होणार आहे. मंदीमुळे बांधकाम व्यवसाय थंडावला आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्यास आणखी अडचणी वाढणार आहेत. यापूर्वीच वाढलेल्या घरांच्या किमतीमध्ये आणखी वाढ होऊन सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर घराच्या किमती जातील. त्यामुळे रेडिरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी यापूर्वीच केली आहे. - गिरीष रायबागे (अध्यक्ष - क्रिडाई कोल्हापूर)