शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डेंजर झोनमध्ये लाल दिवा

By admin | Updated: September 23, 2014 00:48 IST

गैरवापराबाबत कारवाई : प्रादेशिक परिवहन विभागाची धडक मोहीम

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गाडीवर लाल, अंबर व निळा दिवा वापरून गैरवापर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी आज, सोमवारी पत्रकाद्वारे दिला आहे. गृहविभागाच्या सूचनेची पायमल्ली करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम प्रादेशिक परिवहन विभागातर्फे उघडली जाणार आहे.सर्वाेच्च न्यायालयाने १५ आॅक्टोबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशाने गृहविभागाने ४ एप्रिल २०१४ रोजी काढलेल्या परिपत्रकात कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या रंगांचा गाडीवर दिवा वापरावा याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामध्ये लाल, अंबर व निळा दिवा गाडीवर लावण्याबाबत निर्देश दिले आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी या आदेशाचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानेच राज्याच्या परिवहन आयुक्तांनी दिवा असणाऱ्या सर्वच गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिवा असणारी गाडी वापरणाऱ्या अधिकाऱ्यांस नियमांनुसार असा दिवा वापरण्यास परवानगी आहे किंवा नाही. यापूर्वी दिवा वापरण्याचा अधिकार होता. शासन आदेशानंतरही अनेक अधिकारी दिवा असणाऱ्या गाडीचा वापर करीत आहेत किंवा नाहीत त्याची शहानिशा केली जाणार आहे. अधिकारी गाडीत नसताना गाडीचा दिवा कापडाने झाकूनच संबंधित चालकाने गाडीतून प्रवास करावयाचा आहे.परवानगी असणाऱ्या अधिकाऱ्यांनी असा दिवा वापरणे पूर्वी शासकीय परिवहन सेवा किंवा पोलीस विभागातील मोटर परिवहन विभागामार्फतच रीतसर स्टिकर लावूनच घेण्याचा आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीदरम्यान अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून दिव्याचा गैरवापर होत असल्याचे आढळल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच दिव्याच्या बेकायदेशीर वापराबाबत शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस संबंधित खात्याकडे केली जाणार आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)कोल्हापुरात लाल दिवा नाहीजिल्हा परिषद अध्यक्ष पिवळा दिवा, तर जिल्हाधिकारी, आरटीओ, पोलीस, प्रांत व तहसीलदारांना गाडीवर निळा दिवा वापरण्याचा अधिकार आहे. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाच्या व्यक्तीस लाल दिवा तोही स्थिर असावा, असे निर्देश आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, आयुक्त व महापौर यांना दिवा वापरण्याचा अधिकार नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी फक्त मोहिमेवर जाताना दिवा लावण्याचा आहे. कोल्हापुरात सध्या एकही लाल दिव्याची गाडी नाही.टोल वाचविण्याचा दिव्याचा आधारअनेक अधिकारी शासकीय किंवा खासगी कामासाठी मुंबई-पुण्यासह राज्यभर फिरत असतात. अशावेळी टोल वाचविण्यासाठी हे अधिकारी खासगी गाडीत चालकाशेजारी काचेतून दिसेल अशाप्रकारे लाल दिवा ठेवतात. नाक्यांवर मोठा अधिकारी असल्याचे भासवून टोलमधून सुटका करून घेताना दिसतात, अशाप्रकारे दिव्याचा आधार घेऊन टोल वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी करीत आहेत.