शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टीची वसुली १0 कोटींवर

By admin | Updated: November 25, 2014 23:48 IST

पालिकेला दिलासा : दोन दिवसांत ८0 लाखांची वसुली

सांगली : महापालिकेच्या घरपट्टी विभागाने वसुलीचा वेग वाढविल्यामुळे यंदाच्या एकूण वसुलीचा आकडा दहा कोटींवर गेला आहे. गेल्या दोन दिवसात या विभागाने तब्बल ८0 लाखांची घरपट्टी वसूल केली. तांत्रिक कारणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अडकलेली बिलेही तातडीने या विभागाने पाठविल्यामुळे वसुलीत महापालिकेला दिलासा मिळत आहे. महापालिकेच्या घरपट्टी विभागाची चालू आर्थिक वर्षाची एकूण मागणी २६ कोटीची आहे. त्यापैकी २५ नोव्हेंबरअखेर १0 कोटी २0 लाख इतकी वसुली झाली आहे. गतवर्षाच्या थकबाकीचा विचार करता, एकूण वसुली ५0 कोटीच्या घरात आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी घरपट्टी विभागाची यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. २४ सप्टेंबर रोजी एका दिवसात या विभागाने ४८ लाखांची वसुली केली. आज, मंगळवारी ३३ लाख २३ हजार ६0३ रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे वसुलीचा एकूण आकडा आता वेगाने वाढत आहे. सर्व विभागात घरपट्टीची थकबाकी सर्वाधिक आहे. त्यामुळे घरपट्टी विभागाला आयुक्त अजिज कारचे यांनी वसुलीबाबत सक्त सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्यानुसार विभागातील कर्मचारी कामाला लागले आहेत. चालू आर्थिक वर्षात केवळ चार महिने उरले असल्याने कमी कालावधित मोठी वसुली करावी लागणार आहे. गेल्या दोन दिवसांचा वेग कायम राहिला, तर यंदा घरपट्टीची विक्रमी वसुली होऊ शकते. चालू आर्थिक वर्षाची वसुली करतानाच महापालिकेला थकबाकी वसुलीसाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे. (प्रतिनिधी)मालमत्तांची वसुली ६0 लाखांवर मालमत्ता विभागाचे उद्दिष्ट ९ कोटींचे आहे. त्यापैकी आजअखेर ६0 लाख वसूल झाले आहेत. मालमत्तांची ४ ते ५ कोटींची फुगीर आकडेवारी आहे. यामध्ये राष्ट्रपती दौऱ्यावेळी २00८ मध्ये काढण्यात आलेल्या खोक्यांची बिले अजूनही निघत आहेत. त्याचे आकडे उद्दिष्टाला फुगवत आहेत. त्याचबरोबर चुकीच्या मूल्यांकनामुळे काही संस्थांकडे मोठी मागणी गेली आहे. या गोष्टी प्रशासकीय पातळीवर सोडविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.