शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीसाठी दारात सनई-चौघडा

By admin | Updated: January 11, 2016 01:08 IST

जिल्हा बॅँक : वसुलीसाठी संचालक थकबाकीदारांच्या आज दारात जाणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी थकबाकीदार मानसिंगराव गायकवाड, डॉ. संजय एस. पाटील, विजयमाला देसाई यांच्यासह चौघांच्या दारात वसुलीसाठी आज, सोमवारी जाणार आहेत. संचालक मंडळाने गांधीगिरी पद्धतीने वसुलीचा निर्णय घेतला असून, वसुलीसाठी थेट थकबाकीदारांच्या दारात जाणारे जिल्हा बँकेचे पहिलेच संचालक आहे.बड्या थकबाकीदारांमुळे जिल्हा बँक अडचणीत आल्याने प्रशासक आले. प्रशासकानंतर पुन्हा संचालक मंडळ कार्यरत झाले असले तरी त्यांच्यासमोर वसुलीचे मोठे आव्हान आहे. ‘दौलत’, ‘उदयसिंगराव गायकवाड कारखाना’, ‘तंबाखू उद्योग समूह’, ‘इंदिरा कारखाना’ आदी बड्या थकबाकीदारांकडून वसुलीला प्रतिसादच मिळत नाही. त्यातील ‘दौलत’चा तिढा सोडविण्यास यश आले आहे. त्यानंतर उर्वरित थकबाकीदारांकडे संचालक मंडळाने मोर्चा वळविला आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अप्पी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह संचालक, अधिकारी व कर्मचारी सोमवारी दुपारी एक वाजता चार प्रमुख कर्जदारांच्या दारात जाणार आहे. पहिल्यांदा उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांच्या निवासस्थानी सनई-चौघड्यासह संचालक जाणार आहेत. त्यानंतर इंदिरा गांधी महिला साखर कारखान्याच्या अध्यक्षा विजयमाला देसाई यांच्या नागाळा पार्क येथील निवासस्थानी, तंबाखू समूहाचे डॉ. संजय एस. पाटील व कोल्हापूर जिल्हा बीजोत्पादक संघाचे वसंतराव पाटील-कौलवकर यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी धडक देणार आहेत.