शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीचा शहरी विभागात समावेश करण्यास मान्यता

By admin | Updated: January 16, 2016 00:52 IST

नगरपरिषदेसाठी मार्ग मोकळा : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीतील निर्णय

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथे नगरपरिषद स्थापन करण्यासाठी, तसेच या औद्योगिक नगरीचा ग्रामीण विभागात असणारा समावेश रद्द करून शहरी विभागामध्ये करण्यास जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसा ठरावही करण्यात आला. आता फक्त जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांकडून ‘ना हरकत संमती पत्र’ घेतल्यानंतर रौप्यनगरीची नगरपरिषद स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीमध्ये मंजूर करून घेण्यासाठी समाजकल्याण सभापती किरण कांबळे, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांचे प्रयत्न कामी आले.रौप्यनगरीच्या सर्वांगीण विकासासाठी याठिकाणी नगरपरिषदेची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी येथील पत्रकारांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग असणाऱ्या कृती समितीची स्थापना करत जनतेच्या पाठबळाच्या जोरावर लढा उभारला होता. विविध आंदोलने उभारून राज्य शासनाने सातत्याने पाठपुरावा करून नगरपरिषद स्थापन्यास मंजुरी मिळविली होती. येथे नगरपरिषदेची उभारणी करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मान्यता, मंजुरीविहित नमुन्यातील प्रशासनाचे ठराव यादींची पूर्तता करण्याच्या कामाने वेग घेतला आहे. शासनाने काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करून स्थायी समितीमध्ये याप्रश्नी करण्यात आलेला ठराव, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे ना हरकत संमती पत्र घेऊन विहित नमुन्यातील सविस्तर माहिती मागितली होती. दरम्यानच्या काळामध्ये विधान परिषद निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू असल्यामुळे स्थायी समितीची बैठक लांबणीवर पडली होती. परिणामी, शासनाने मागविलेली माहिती पाठविण्यास थोडा विलंब लागला. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी समाजकल्याण सभापती किरण कांबळे व जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांनी प्रयत्न करून बैठकीमध्ये ठरावास मान्यता मिळविली. यापुढील कालावधीत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांचे ना हरकत संमती पत्र घेऊन शासनाकडे पाठवून देणे इतकेच काम राहिले जाते. त्यानंतर शासन पातळीवरील सर्व मंजुरी व मान्यतांची पूर्तता होताच रौप्यनगरीवासीयांचे गेल्या २५ वर्षांपासूनचे असणारे नगरपरिषद स्थापन्याबाबतचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. (वार्ताहर)पदांना मुकावे लागणारनगरपरिषदेची स्थापना जर येत्या काही दिवसांमध्ये झाल्यास समाजकल्याण सभापती किरण कांबळे, पंचायत समिती सदस्य रावसाहेब पाटील, सुप्रिया सलमर व सरपंच दीपाली शिंदे, उपसरपंच राजेंद्र सुतार यांच्यासह अन्य १५ ग्रामपंचायत सदस्यांना आपआपल्या पदांना मुकावे लागणार आहे. परिणामी, रौप्यनगरीवासीयांतून ‘खुशी’, तर पदाधिकाऱ्यांमध्ये ‘गम’चे वातावरण अनुभवण्यास मिळत आहे.