शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘रंकाळा’ प्रभागाला अपुऱ्या निधीचे ग्रहण

By admin | Updated: March 4, 2015 23:52 IST

कामे जास्त, निधी कमी : नव्याने वाढणाऱ्या वसाहतींमुळे पायाभूत सुविधांची मागणी जास्त

भौगोलिकदृष्ट्या मोठ्या व उपनगरात येणाऱ्या या प्रभागात फुलेवाडी, अंबाई टँक, हरिओमनगर, साने गुरुजी पूर्व बाजू, रंकाळा तलाव परिसर अशी रचना आहे. या प्रभागाला अंतर्गत रस्ते, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि ड्रेनेजच्या समस्येने ग्रासले आहे. याचबरोबर शहराच्या एका बाजूला असणाऱ्या या प्रभागात रस्त्यांची लांबी अधिक असल्याने निधीची चणचण मोठ्या प्रमाणात जाणवते. ऐतिहासिक रंकाळ्याचा भाग असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांना नेहमीच आवाज उठवावा लागतो. अशा या प्रभागात कामे अधिक अन् निधी अपुरा, अशी स्थिती झाली आहे. या प्रभागात नव्याने जादा बांधकामे होत आहेत. या बांधकामांमुळे अंतर्गत गटारी, ड्रेनेज पाईपलाईन, आदींसाठी निधीची बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी नगरसेविका पाटील यांना सातत्याने प्रयत्न करावा लागतो. सतत बदल होणाऱ्या या प्रभागात रंकाळा प्रदूषण, इराणी खण परिसराची स्वच्छता, सुशोभीकरण, पथदिवे, आदी कामांची मोठी यादी आहे. यातच लाखो रुपये खर्चून पक्षी निरीक्षण केंद्राची स्थापना केली आहे. मात्र, याचा वापर म्हणावा तितका होत नाही. सायलेन्स झोन असूनही अवजड वाहतूक होत असते. रंकाळ्याभोवतीची वाढती अतिक्रमणे ही समस्या वाढू लागली आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरसेविका पाटील यांनी पहिल्या वर्षापासून अंबाई टँक, मोहिते पार्क, डोंगळेनगर, टाकळकर कॉलनी, फुलेवाडी बसस्टॉप, आदी भागांतील समस्यांना प्राधान्य दिले आहे. हरिओमनगर येथील नागरिकांनी या परिसरात मोबाईल टॉवर लावण्यास विरोध केला आहे. यासाठी मी नगरसेविका म्हणून त्यांच्याबरोबर राहिले. यापुढेही टॉवरच्या विरोधात उभी राहणार आहे. याचबरोबर भौगौलिकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या या प्रभागात कामे अनेक आहेत. कामे करण्याची इच्छा प्रबळ आहे. मात्र, निधी कमी पडत आहे.- रेखा पाटील, नगरसेविका