शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सोलापूर, बीडची विजयी सलामी

By admin | Updated: December 21, 2015 00:30 IST

राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा

वारणानगर : येथे खेळल्या जात असलेल्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात रत्नागिरी, सोलापूर, बीड, नाशिक संघाने, तर मुलींच्या गटात अहमदनगरसह सोलापूर, मुंबई संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवीत विजयी सलामी दिली. येथील श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाने पुरुष व महिला गटांच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. येथील तात्यासाहेब कोरे क्रीडा प्रबोधिनी व तात्यासाहेब कोरे मिलिटरी अकॅडमीच्या क्रीडागंणावर दिवसा व रात्री प्रकाशझोतात या स्पर्धा खेळल्या जात आहेत. रविवारी साखळी सामने खेळण्यात आले. मुलांच्या गटात नाशिक विरुद्ध हिंगोली यांच्यात २४-६ असा सामना होऊन नाशिकने १८ गुणांची आघाडी घेत विजयी सलामी दिली. नाशिकच्या विनोद वाणी याने सहा गुण, तर हिंगोलीच्या पुरोहित सुकेशने सहा गुण मिळविले. बीड विरुद्ध अहमदनगर यांच्यात झालेल्या सामन्यात बीडने सर्वाधिक गुणांची कमाई करीत ७२-२९ असा सहज विजय मिळविला. बीडच्या सय्यद एसने १५ गुण नोंदविले, तर नगरच्या मयूरेश भापकर याने आठ गुणांची नोंद केली. याच गटात सोलापूर विरुद्ध परभणी यांच्यात ५३-१९ असा सामना होऊन सोलापूरने ३४ गुणांनी विजयी सलामी दिली. सोलापूरच्या हर्षद शेखने १४ व निखील टिळे याने १२ गुणांची कमाई केली. परभणीच्या रवी पाटोळेने आठ गुण नोंदविले. रत्नागिरी विरुद्ध चंद्रपूर यांच्या ४५-२२ असा सामना झाला. यात रत्नागिरीने २३ गुणांनी हा सामना जिंकला. मुलींच्या गटात सोलापूर विरुद्ध सिंधुदुर्ग यांच्यात ४०-९ असा सामना झाला. सोलापूरने ३१ गुणांनी एकतर्फी सामना जिंकला. सोलापूरची रकन्दा मिरगू हिने ११ गुण नोंदविले, तर मुंबई साऊथ ईस्ट विरुद्ध ठाणे यांच्यात ५५-१८ असा सामना झाला. मुंबई साऊथ ईस्टने ३७ गुणांनी हा सामना जिंकला.महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष जयंत देशमुख, सचिव कृष्णन मुथुकु, ललीत नाहटा, सरदार मोमीन, आदी पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन सर्व खेळाडूंचे स्वागत केले. (वार्ताहर)