शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेशन ग्राहकांचा २६ मार्चला सरकारविरोधात ‘एल्गार’

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

मुंबईत निघणार मोर्चा : रेशन बचाव प्रतिनिधींच्या राज्यस्तरीय बैठकीत निर्णय

कोल्हापूर : रेशन व्यवस्थेबाबत सरकारच्या चुकीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी २६ मार्चला रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय गुुुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत झाला. यासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून जनजागरणाकरिता सूत्रबद्ध कार्यक्रम आखण्याचेही ठरले. टाटा समाज विज्ञान अकादमी येथे राज्यातील रेशन चळवळीतील २२ संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेशन बचाव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत यादव उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शोषित जनआंदोलन समितीच्या अध्यक्षा उल्का महाजन होत्या.दिवसभर चाललेल्या बैठकीत सरकारच्या रेशन धोरणावर सविस्तर चर्चा होऊन विविध महत्त्वपूर्ण निर्णय झाले. यामध्ये २६ मार्चला मुंबईत रेशन ग्राहकांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता हा मोर्चा सुरू होऊन तो कोतवाल गार्डन ते चैत्यभूमी असा जाईल. शांताकुमार समितीच्या शिफारशी रद्द कराव्यात. रोख अनुदानाऐवजी रेशनवर धान्य पाहिजे. केशरी कार्डावरील धान्याची तरतूद झालीच पाहिजे. अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना १२ किलो धान्य मिळाले पाहिजे, यांचा समावेश आहे.सरकारच्या रेशन धोरणाविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी जनतेची राज्यव्यापी चळवळ उभी करणे गरजेचे असल्याचे चंद्रकांत यादव यांनी सांगितले. त्यानुसार जनजागरणासाठी मोहिमा, सभा, संमेलने, परिषदा, मेळावे या माध्यमांतून सूत्रबद्ध कार्यक्रम आखला जावा, असेही त्यांनी सांगितले. त्याला सर्वांनी एकमुखी मान्यता दिली. दरम्यान, कोल्हापुरातील रेशनविरोधी निघालेल्या भव्य मोर्चाची दखल राज्यभरातील संघटनांनी घेतली.यावेळी रेशन कृती समितीचे सुरेश सावंत, अन्न अधिकार अभियानाच्या मुक्ता श्रीवास्तव, जनहित मोर्चाचे रिची बऊ, न्यायालयनियुक्त सल्लागार समितीचे प्रतिनिधी डॉ. अण्णा शिरवाडकर, ‘मूव्हमेंट चीफ अ‍ॅँड जस्टिस’चे शब्बीर देशमुख, आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)