शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘रॅँचो’ची चटका लावणारी एक्झिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:22 IST

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, विमानतळ आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रूम अशी एक ना ...

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई, जोतिबा मंदिर, विमानतळ आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे आणि मतदान यंत्रांच्या स्ट्राँग रूम अशी एक ना अनेकांची सुरक्षा, अशा एक ना अनेक जबाबदाऱ्या असणाºया कोल्हापूर पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकातील ‘रॅँचो’ या श्वानाचे बुधवारी उपचारादरम्यान शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये निधन झाले. तो १५ दिवसांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होता.अभिनेता अमिर खानने ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात ‘रॅँचो’ या हुशार विद्यार्थ्याची भूमिका रंगविली होती. ती व्यक्तिरेखा चित्रपट रसिकांना खूप भावली. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकातही असा हुशार, लॅब्रेडॉर जातीचा रॅँचो नावाचा श्वान होता. तोही सुरक्षा व्यवस्था पाहण्याच्या कर्तव्यावर होता. त्याने कामातही कधीही कसूर केली नाही. रॅँचो गेल्या आठ वर्षांपासून पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकात ‘राखी’ या श्वानाबरोबर काम करीत होता. मात्र, १५ दिवसांपूर्वी त्याची तब्येत बिघडली. तरीही तो मतदान यंत्रे ठेवलेल्या ठिकाणाचीही रोज तपासणी करीत होता. त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखविल्यानंतर मधुमेह झाल्याचे निदान झाले. त्याच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेली. बॉम्बशोध पथकात कार्यरत असलेल्या श्वानाचे वारंवार घ्याव्या लागणाºया श्वासामुळे इतर श्वानांच्या तुलनेत फुप्फुस लवकर खराब होते. त्यामुळे त्याची फुप्फुसेही काम करीत नव्हती. गेल्या दोन दिवसांपासून त्याला श्वास घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावली. त्यात बुधवारी सकाळपासून त्याने अन्नपाणी घेणे बंद केले. उपचारादरम्यान सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयात श्वानपथकाच्या शाखेसमोरील मोकळ्या जागेत त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून त्याला अखेरची मानवंदना दिली.८ वा वाढदिवस अधुराचरॅँचोचा जन्म २५ मे २०११ चा. तो तीन महिन्यांचा असताना त्याला इचलकरंजीहून विकत घेण्यात आले होते. त्याला आणखी तीन दिवसांनी अर्थात २५ मे रोजी सात वर्षे संपून आठवे वर्ष लागणार होते. त्यामुळे अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेला त्याचा आठवा वाढदिवस अधुराच राहिला.