कोल्हापूर : केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने ११ ते १६ जानेवारी दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवारी (दि.११) या आंदोलनाचा पहिला दिवस होता, यावेळी नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
शेतकऱ्यांना पाठिंबा व जाचक कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी संघटनेच्या वतीने देशभर आंदोलन करण्याची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक वामन मेश्राम यांनी केली आहे. हे आंदोलन देशातील ५५० जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे. सोमवारी कोल्हापुरातदेखील या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटना व व्यक्तींनी प्रत्यक्ष सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--