शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

राणे, आवाडेंना नको कोण म्हणणार?

By admin | Updated: March 27, 2017 01:09 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची ‘गुगली’: राज्य सरकार स्थिर असल्याचा दावा

कोल्हापूर : उत्तर प्रदेशातील भाजपच्या विजयानंतर जर ओमर अब्दुल्ला २०१९ ऐवजी २०२४ च्या लोकसभेची तयारी करायला हवी, असे म्हणत असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावामुळे नारायण राणे, प्रकाश आवाडे यांच्यासारखे नेते जर भाजपमध्ये येत असतील तर त्यांना नको कोण म्हणेल; असा प्रतिप्रश्नच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. प्रेस क्लबच्या कार्यालय उद्घाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, या दोघांच्या प्रवेशाबद्दल मला माहीत नाही; परंतु त्या-त्या भागांतील नेते, कार्यकर्त्यांशी बोलून असे निर्णय घेतले जातात. ते काम प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे करतील. राणे हे शिवसेनेत जातील, भाजपमध्ये जातील आणि काँग्रेसमधून बाहेर पडणारच नाहीत, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते. हवी-हवीशी वाटणारी अशी माणसे फार कमी असतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले. अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. राणे यांचेही नाव तसेच चर्चेत आले आहे.मात्र, शिवसेनेच्या विरोधात जाणीवपूर्वक काही मोहीम चालविली आहे अशातला हा भाग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात मध्यावधी निवडणुकांची चर्चा आहे. याबाबत विचारल्यानंतर ही शक्यता त्यांनी फेटाळून लावली; कशासाठी ही चर्चा. २८८ पैकी जवळपास २०० आमदार आमचे आणि शिवसेनेचे असल्यानंतर ही चर्चा निरर्थक आहे. वादाचे अनेक विषय असतात. त्यावरून मतभेद होतात. मंत्रिपदे, त्यांचा दर्जा, त्यांची जबाबदारी असे अनेक विषय असतात. घरात पती-पत्नीचेही नेहमी भांडण होत असते तसेच हे विषय आहेत. त्यामुळे निवडणुकांच्या चर्चेमध्ये काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले. ‘मातोश्री’वर जाणार नाहीचंद्रकांतदादा म्हणाले, मी आणि सुधीर मुनगंटीवार ‘मातोश्री’वर जाणार असल्याची चर्चा आहे; पण आता तसे काही कारण नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना अभिनंदनाचा फोन केला होता तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना सपत्निक भोजनाचे निमंत्रण दिले आहे, असे पाटील यांनी सांगितले.