शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळ्यासमोरचा रस्ता रखडला; चक्क पार्किंगचा अड्डा बनला !

By admin | Updated: February 7, 2015 00:10 IST

‘आयआरबी’कडून अद्याप २५ कोटींपेक्षा अधिकची प्रलंबित कामे करण्याबाबत ‘आयआरबी’ला पत्रव्यवहार केला चार वर्षांतील डीएसआरमध्ये फरक असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान

कोल्हापूर : एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील निकृष्ट व गेल्या चार वर्षांपासून रखडलेला रंकाळा चौपाटीसमोरील ‘डी मार्ट’च्या दारातील रस्ता वाहनधारकांची मोठी डोकेदुखी बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून येथे एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने वाहनांची कोंडी नित्याची बनली आहे; तर बंद रस्त्याचा फायदा घेत येथे झालेल्या मॉलने रस्त्यावरच चक्क पार्किंगची सोय केली आहे. याकडे महापालिका प्रशासन मात्र सोपस्कारपणे दुर्लक्ष करत आहे.शहरातून तळकोकणात जाणारा मुख्य वाहतुकीचा मार्ग म्हणून या रस्त्यास मोठे महत्त्व आहे. सतत वर्दळीचा असणारा हा रस्ता मात्र सुविधेच्या बाबतीत दुर्लक्षित आहे. हा रस्ता गेली चार वर्षे खचलेलाच आहे. तसेच रस्त्याबाबत स्थानिक मिळकतधारकांचा वाद आहे. त्यामुळे चौपाटीपासून रंकाळा टॉवरकडे येणारा रस्ता बंद करत एकेरी मार्ग करून महापालिका प्रशासन मोकळे झाले आहे. हा रस्ता करण्याची जबाबदारी ‘आयआरबी’ची आहे. मात्र, सततची आंदोलने व काम करण्याचा निरूत्साह यामुळे ‘आयआरबी’ने शहरातील सर्वच प्रलंबित कामे थांबविली आहेत. हा रस्ताही महापालिका व आयआरबी यांच्या वादात अडकला आहे.दर शनिवारी व रविवारी किंवा सुट्यांदिवशी पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. दररोज सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत याठिकाणी वाहनांची प्रचंड कोंडी होते. शिवाय मार्गावरील दोन्ही बाजूंचे गटारींचे कामही अपूर्ण आहे. काही ठिकाणी तर गटारी पूर्णपणे उघडी आहेत. पादचारी, दुचाकीस्वार या गटारींमध्ये पडून छोटे-मोठे अपघात होत आहेत.खचलेला रस्ता ‘जैसे थे’पुढील बाजूस पेट्रोलपंपाजवळही काही महिन्यांपूर्वी रस्ता खचला आहे. त्याची दुरुस्ती न करता त्याला बॅरेकेटिंग लावून वाहतूक सुरू आहे. ‘आयआरबी’कडून अद्याप २५ कोटींपेक्षा अधिकची कामे प्रलंबित आहेत. ही कामे करण्याबाबत ‘आयआरबी’ला पत्रव्यवहार केला आहे. गेल्या चार वर्षांतील डीएसआरमध्ये फरक पडत असल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. लवकरच रंकाळा चौपाटीसह वाहतुकीस अडथळा असणाऱ्या मार्गावरील सर्वच कामे करण्याचा प्रशासन विचार करत आहे. - नेत्रदीप सरनोबत शहर अभियंता