शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदला सामाजिक ऐक्याची दुवा

By admin | Updated: July 8, 2016 01:01 IST

जिल्ह्यात अपूर्व उत्साह : नमाज पठण, शुभेच्छांचा वर्षाव, शिरखुर्म्याचा आस्वाद; इचलकरंजीत विश्वशांतीसाठी प्रार्थना

कोल्हापूर : नमाज पठण, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, शिरखुर्म्याचा आस्वाद आणि अधून-मधून पावसाच्या सरी झेलत मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण गुरुवारी उत्साहात साजरा झाला. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणात तसेच विविध मशिदींमध्ये सकाळी नमाज पठण करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने सर्वच मशिदींच्या पटांगणावर सकाळी नमाज पठण झाले. मुस्लिम बोर्डिंग येथे पहिल्या जमातीसाठी मुफ्ती इरशाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या जमातच्या नमाजासाठी हाफिज आकिब म्हालदार व तिसरी जमातसाठी मौलाना राहमतुल्ला कोकणे यांनी नमाज पठण केले. सर्वांनी कोल्हापूरची व देशाची एकात्मता तसेच सुख-शांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, बसवराज शिवपुजे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, भाजपचे शहराध्यक्ष संदीप देसाई, आर. के. पोवार, राजू लाटकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, एपीआय सुशांत चव्हाण, पीएसआय युवराज पांढरे उपस्थित होते. संस्थेचे प्रशासक कादरभाई मलबारी यांनी स्वागत केले. अध्यक्ष गणी आजरेकर यांनी आभार मानले. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक पापाभाई बागवान, हा. लियाकत मुजावर, साजिद खान, अमीर हमजेखान शिंदी, हा. जहाँगीर अत्तार, हाजी मुसा पटवेगार, रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, मलिक बागवान यांच्या हस्ते शिरखुर्म्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय शहरातील बागल चौकातील कब्रस्तान मशीद, शनिवार पेठेतील गवंडी मस्जिद, कदमवाडी, मणेरमळा, आदिलशाह मस्जिद, अकबर मोहल्ला, मणेर मस्जिद, कब्रस्तान मस्जिद, विक्रमनगर मस्जिद, वाय. पी. पोवारनगर, साकोली कॉर्नर, टाकाळा, जमादार कॉलनी, कसबा बावडा, रंकाळा मस्जिद, आदी मस्जिदींमध्ये नमाज पठण झाले. इदनिमित्त मुस्लिम बांधवांच्या कुटुंबांतही पाहुण्यांचा राबता होता. पुरुष मंडळी, महाविद्यालयीन मुलांचा मित्रपरिवार यांच्यासह कार्यालयीन सहकाऱ्यांना शिरखुर्म्याचा आस्वाद घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. कुटुंबातील महिला आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यात गुंतल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत शहरात उत्साहाचे वातावरण होते.सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावरही रमजान ईद साजरी करण्यात आली. धर्म-जात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची... एकमेकांच्या गाठीभेटी घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदची... अशा शुभेच्छा संदेश दिवसभर व्हॉट्स अ‍ॅपवर फिरत होते. विशेषत: चंद्र आणि लहान मुलांचे गळाभेट घेत असलेले छायाचित्र पसंतीस उतरत होते.