शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगडमध्ये आपुलकीने साजरा होतो रमजान

By admin | Updated: July 7, 2015 23:51 IST

तालुक्यात १४ गावांत मस्जिदी : धार्मिक विधींनी मंगलमय वातावरण --महिना रमजानचा सामाजिक सलोख्याचा !

शिवाजी सावंत-गारगोटी -भुदरगड तालुक्यात अत्यल्प असणारा मुस्लिम समाज रमजानच्या पवित्र महिन्यात मात्र सर्वव्यापी असल्याचे भासते. दानधर्म, पाचवेळा नमाज पठण, रोजा, तरावीह पठण यांसारख्या धार्मिक विधींनी वातावरण मंगलमय झाल्याचे पाहावयास मिळते.भुदरगड तालुक्यात १४ गावांमध्ये मस्जिदी आहेत. तर एकवीस गावांमध्ये मुस्लिम समाज आहे. अनफ खुर्द अनफ बुद्रुक अनफवाडी या गावांमध्ये १०० टक्के धर्मीय मुस्लिम राहतात. शिवाय या गावातील पुरुष मंडळी पोटापाण्यासाठी सौदी अरेबिया, दुबई या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने राहतात. करार संपेपर्यंत ही मंडळी गावाकडे येत नाहीत. त्यामुळे गावाकडे असणारी मंडळी या महिन्यातील हा सण साजरा करतात. काही गावांमध्ये इतर धर्मीयांकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते. सर्व धर्मीय हा सण गुण्यागोविंदाने साजरा करतात. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलेदेखील हा उपवास करतात. चिमुकल्यांची धार्मिकवृत्ती मोठ्यांनाही अचंबित करण्यासारखी आहे. तालुक्यातील २१ गावांमध्ये सुमारे तीन हजार लोकसंख्या आहे. इतक्या अल्प प्रमाणात हा समाज असतानादेखील धार्मिकविधी मिळून मिसळून साजरे करतात.संध्याकाळचा रोजा इफ्तार मस्जिद साजरा करण्यावर त्यांचा कटाक्ष असतो. न जमल्यास घरीच रोजा इफ्तार केला जातो. इफ्तारनंतर मगरीब नमाज पठण होते. रात्री नऊनंतर तरावीह नमाज पठण होते.सध्या तालुक्यात गारगोटी, शेणगाव, कडगांव, तिरवडे, अनफ खुर्द, अनफ बुद्रुक, अनफवाडी फकीर आवार, पाटगांव, वेसर्डे, भुदरगड, बारवे, मडूर, वेंगरूळ या ठिकाणी मस्जिदी आहेत. येथे दिवसातून पाच वेळा नमाज पठण तसेच तरावीहचे पठण होते. या व्यतिरिक्त वाघापूर, कूर, पिंपळगाव, वांगरगाव, दिंडेवाडी, दासेवाडी या गावांमध्ये मस्जिदी नाहीत; पण तुरळक प्रमाणात समाज आहे. गारगोटी येथील मस्जिदीत हाफीज सिद्घिक शेख हे इमामसाब म्हणून काम पाहतात, तर बाबाजान देसाई हे जिम्मेदार म्हणून काम करीत आहेत.कडगाव येथे जुम्मा मस्जिद असून, येथे सुन्नत मुस्लिम जमात कार्यरत आहे. नमाज पठणासह रोजा इफ्तारसाठी मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधव आवर्जून उपस्थित राहतात. मस्जिदीचे जिम्मेदार सदस्य म्हणून दिलावर अबू काझी, यासीन नुरुद्दीन काझी, महमंद इब्राहीम काझी, वजीर गफूर मकानदार, आदी कार्यरत आहेत.अनफ खुर्द व अनफ बुद्रुक या दोन्ही गावांत सर्वच समाज हा मुस्लिम आहे. इथली लहान मुले ही मराठी, उर्दू आणि हिंदी या तिन्ही भाषा बोलू शकतात, तर इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांनी इंग्रजी ही चौथी भाषा सुद्धा अवगत केली आहे. शिवाय या धर्मातील मुली शिक्षण घेत आहेत. एक आगळावेगळा असा पे्रमाचा भाईचारा येथे रुजला आहे. जितक्या आनंदाने इतर धर्मीयांचे सण साजरे होतात.दिवसभर रोजा असताना देखील प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी भुकेचा लवलेशही चेहऱ्यावर न दाखविता आनंदाने बागडत असतात. संपूर्ण दिवसभरात पाण्याचा एक थेंब देखील तोंडात न घेता केलेला उपवास हा त्यांचे धर्माविषयीचे प्रेम व दृढनिश्चयता दर्शवितो. अनफ येथील सर्व विद्यार्थ्यांना त्याच गावातील मदरसामधून धार्मिक शिक्षण देण्याची व्यवस्था केली आहे. हे सर्व विद्यार्थी सकाळी व संध्याकाळी न चुकता अरबी भाषेतील ‘कुरआन’चे शिक्षण घेतात.