शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

राजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये समेट घडविणार

By admin | Updated: June 12, 2017 23:44 IST

राजू शेट्टी-सदाभाऊंमध्ये समेट घडविणार

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील मतभेदामुळे मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल महाडिक यांनी या दोघांमध्ये समेट घडविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य सरकारने रविवारी शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत घोषणा केल्यानंतर सोमवारी राजू शेट्टी मुंबईहून मतदार संघात परतले. यावेळी पेठनाक्यावर महाडिक कुटुंबियांच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी राहुल महाडिक यांनी कोल्हापूर येथे जाऊन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेतली.इस्लामपूर पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात विकास आघाडी स्थापन करण्यात राहुल महाडिक यांचे मोठे योगदान होते. भाजपचे विक्रम पाटील केवळ भाजपच्याच चिन्हावर निवडणूक लढविणार होते. त्यातच महाडिक युवा शक्तीनेही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नेते नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक यांनी खासदार शेट्टी व खोत यांच्या सहकार्याने विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्वांना एकत्र आणण्यात यश मिळविले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ३५ वर्षाच्या सत्तेला धक्का देत पालिकेवर विकास आघाडीची सत्ता आली.खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत एकत्र असताना अनेक आंदोलने यशस्वी झाली आहेत. परंतु खोत यांना मंत्रीपद मिळाल्यापासून ते शेट्टींपासून दुरावले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले. हे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आता राहुल महाडिक यांनी या दोघांमधील अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. महाडिकांची जिल्ह्यात ख्यातीनानासाहेब महाडिक, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक सध्या कोणत्याही पक्षात नाहीत. मात्र ते ज्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना खंबीर साथ देतात, अशी त्यांची ख्याती आहे. यापूर्वी सदाभाऊ खोत मंत्री झाल्यानंतर त्यांचा पेठनाक्यावर महाडिक संकुलात सत्कार करण्यात आला होता. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिल्याबद्दल राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. या दोघांमध्ये समेट घडविण्यासाठी महाडिक यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.