शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र पाटील-यड्रावकर शक्य

By admin | Updated: December 16, 2014 00:40 IST

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष निवडीचे वारे : इच्छुकांच्या हालचाली गतिमान

राजाराम लोंढे - कोल्हापूर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवड शक्य मानली जात आहे. पक्षांतर्गत निवडणुकीतून जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार असली, तरी प्रदेश पातळीवरून ज्या नावाची शिफारस होते, त्यावरच शिक्कामोर्तब केले जाते. संस्थात्मक पातळीवर सरस असणारा सध्या तरी यड्रावकर हा एकमेव तरुण चेहरा पक्षाकडे असल्याने त्यांच नाव आघाडीवर आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा श्रेष्ठींकडे पाठविला आहे. तो प्रदेशकडून मंजूर करण्यात आला नसला, तरी जिल्हाध्यक्ष म्हणून तरुण ताकदीचा चेहरा देण्याच्या दृष्टीने पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. आगामी संस्थात्मक निवडणुकीत शिवसेना, भाजप व काँग्रेस यांच्या आक्रमणाला त्याच ताकदीने तोंड देणारा चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. त्यासाठी के. पी. पाटील यांनाच पुन्हा संधी द्यावी, असा मतप्रवाह काहीजणांचा आह; पण के. पी. पाटील फारसे उत्सुक नाहीत, त्यातच तरुण व नवीन चेहरा देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी भैया माने, राजेंद्र पाटील, ए. वाय. पाटील व अरुण इंगवले यांच्या नावाची सध्या पक्षातंर्गत चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष निवडताना संघटनात्मक पातळीवर काम करणारा, संस्थात्मक पाठबळ असलेला व कार्यकर्त्यांचे मोहळ असलेला चेहऱ्याला पसंती दिली जाते. भैया माने यांना संधी मिळू शकते; पण कागल तालुक्यात राष्ट्रवादी सक्षम असल्याने ते जबाबदारी घेतील, असे वाटत नाही. ए. वाय. पाटील यांना संधी दिली तर पुन्हा ‘मेहुण्या-पाहुण्या’च्या राजकारणाबद्दल वेगळा संदेश कार्यकर्त्यात जाईल, त्यामुळे त्यांचे नाव निवडणुकीपूर्वीच स्पर्धेतून बाजूला गेल्याचे समजते.अरुण इंगवलेही इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो; पण संस्थात्मक पातळीवर त्यांच्यावर मर्यादा असल्याने राजेंद्र पाटील यांचे नाव पुढे येत आहे. हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी वाढीवर मर्यादा आल्या आहेत, यड्रावकर यांना संधी दिली, तर शिरोळ, हाकणंगले, शाहूवाडी व इचलकरंजी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवाच्या बैठकीत के. पी. पाटील यांनी यड्रावकर यांना तसे संकेतही दिले आहेत. आता पक्षाच्या निमंत्रणाची वाट पाहू नका, तुम्हालाच पुढे येऊन निमंत्रण द्यावे लागणार असल्याचे के. पी. पाटील यांनी स्पष्ट केल्याने यड्रावकरांच्या नावाला बळकटी मिळाली आहे. आजपर्यंतचे जिल्हाध्यक्ष दिवंगत बाबासाहेब कुपेकरके. पी. पाटीलव्ही. बी. पाटीललेमनराव निकममानसिंगराव गायकवाड (दोन महिन्यांसाठी)के. पी. पाटील $$्निराजेंद्र पाटील यांचेच नाव का ?संस्थात्मक व कार्यकर्त्यांचा संच असणारा एकमेव तरुण चेहराशिरोळ, हातकणंगले तालुक्यात स्वतंत्र गट हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत विरोधकांना शहपंधरा वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदापासून हातकणंगले वंचित