शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

राजापूरचा हायड्रोलिक बंधारा कागदावरच

By admin | Updated: December 25, 2014 00:26 IST

लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरज : ‘शासकीय काम, सहा महिने थांब’चा अनुभव

संदीप बावचे- शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्याला पर्याय देण्यासाठी कर्नाटकातील हिप्परगी धरणाचा पॅटर्न वापरून हायड्रोलिक (स्वयंचलित) पद्धतीचा बंधारा उभारण्यात येणार आहे. हायड्रोलिक पद्धतीच्या बंधाऱ्याचे डिझाईन (रेखाचित्र) करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नाशिक येथील कंपनीकडे आराखडा पाठविण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षे उलटली, तरी याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तालुक्यातील २२ गावांना गेल्या ३४ वर्षांपासून बंधाऱ्याच्या बॅकवॉटरचे पाणी नागरिकांना जीवनदायी, तर शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे बहुतांशी दगड निखळून गेल्याने बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. ऐन उन्हाळ्यात पाणी गळतीमुळे पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. बंधाऱ्याची तात्पूर्ती दुरुस्ती होत असली तरी ३४ वर्षे पूर्ण झालेला बंधारा कितपत टिकणार, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. सध्या असलेला बंधारा कोल्हापूर पद्धतीचा आहे. ही संकल्पना आता कालबाह्य झाल्याने आधुनिक यांत्रिकी (हायड्रोलिक) पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी हालचाली सुरू केल्या होत्या. डिझाईन मंजुरीनंतर या बंधाऱ्यासाठी खर्च किती अपेक्षित आहे, हे समजणार होते. त्यानंतर असा बंधारा उभारण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येणार होता.तत्कालीन आमदार डॉ. सा. रे. पाटील यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या मागणीनुसार राजापूर बंधाऱ्याला पर्याय म्हणून हायड्रोलिक पद्धतीचा बंधारा उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून हालचाली झाल्या होत्या. दरम्यान, नाशिक येथील कंपनीकडून राज्यातील बंधाऱ्यांची रेखाचित्रे (डिझाईन) तयार केली जातात. राजापूर बंधाऱ्याचेही रेखाचित्र तयार करण्यासाठी माहिती पुरविण्यात आली आहे. पुन्हा स्मरणपत्र देणार असल्याची माहिती पाठबंधारे विभागाचे वायचळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शिरोळ तालुक्यासाठी राजापूर बंधारा महत्त्वाचा असून, या बंधाऱ्यामुळे २२ गावांतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटतो. पाठबंधारे विभागाकडून बंधाराच्या नूतनीकरणासाठी संथ गतीने हालचाली सुरू असल्या, तरी आपण या प्रश्नी लक्ष घालून पाठपुरावा करू.- आमदार उल्हास पाटील