शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शंकरराव माने यांचा पुतळा उभारा

By admin | Updated: September 29, 2015 00:10 IST

डी. वाय. पाटील : ‘स्वातंत्र्यसेनानी-माजी खासदार शंकरराव माने पथ’ नामकरण

कोल्हापूर : स्वातंत्र्यलढ्यातील व स्वातंत्र्योत्तर काळातील कार्याचा व्याप पाहता स्वातंत्र्यसेनानी शंकरराव माने यांच्या गौरवार्थ पुतळा उभारण्यात यावा, अशी अपेक्षा बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केली. यावेळी त्यांनी माने यांचा पुतळा उभारण्याचा सर्व खर्च स्वत: करण्याची तयारीदेखील दर्शविली.कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे महावीर महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाचे ‘स्वातंत्र्यसेनानी व माजी खासदार शंकरराव माने पथ’ या नामकरण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते नामकरण फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर वैशाली डकरे तर, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, डी. वाय. पाटील शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संजय डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षात १९६९ मध्ये झालेल्या घडामोडींत शंकरराव माने यांच्यासमवेत आमदार म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमवेत राहून व्ही. व्ही. गिरी यांना राष्ट्रपतिपदासाठी मतदान करता आले. माने यांनी स्वातंत्र्यलढा व स्वातंत्र्योत्तर काळात देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ त्यांचा पुतळा उभारण्यात यावा.माजी आमदार मालोजीराजे छत्रपती म्हणाले, शंकरराव माने यांच्या सामाजिक, राजकीय कार्याने कोल्हापूरकरांची मान उंचावली आहे. स्वातंत्र्यलढ्यात कोल्हापुरातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल विल्सनचा पुतळा उद्ध्वस्त करून याठिकाणी त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविला. त्यामुळे शिवाजी चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे खरे शिल्पकार शंकरराव माने व त्यांचे सहकारी आहेत.महापौर डकरे म्हणाल्या, महावीर महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाला शंकरराव माने यांचे नाव देऊन स्वातंत्र्यसेनानी व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वाचे स्मरण करण्याचे भाग्य महानगरपालिकेला लाभले आहे.कार्यक्रमास स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, उद्योजक दिलीप मोहिते, प्रवीणसिंह घाटगे, दादासो लाड, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी आमदार सुरेश साळोखे, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, प्रशांत चिटणीस, पोलीस गृह उपअधीक्षक अनिल पाटील, माजी पोलीस उपअधीक्षक सुरेश पवार, नगरसेविका सरस्वती पोवार, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अजित पवार, डॉ. संदीप नेजदार, राजाराम गायकवाड, निशिकांत मेथे, प्रदीप उलपे, सुभाष बुचडे, दत्तात्रय इंगवले, डॉ. आर. व्ही. भोसले, माजी जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील, शिवाजीराव चव्हाण, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, डी. डी. पाटील, आर. एस. पाटील, अनिल शिंदे, मधू बामणे आदी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी प्रास्ताविक केले. क्रिडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राजीव परिख यांनी आभार मानले.