शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

राधानगरीत अतिवृष्टी; धरणाचे पाच दरवाजे उघडले

By admin | Updated: October 10, 2016 00:51 IST

शेतकऱ्यामध्ये चिंता : दसऱ्याच्या उत्साहावर पाणी

राधानगरी : राधानगरी तालुक्यात रविवारी पावसाने कहर केला. दाजीपुरात सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ तासांत तब्बल १२६ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे दसऱ्याच्या उत्साहावर पाणी फिरले. तसेच काढणीला आलेल्या भात व अन्य पिकांवर पावसाचा विपरीत परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंता व्यक्तहोत आहे. दाजीपूर परिसरातील जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे सुरू झाले. दोन्ही वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली. रविवारी सकाळपासूनच वातावरण ढगाळ झाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अशीच स्थिती असल्याने थोड्या प्रमाणात पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र, दुपारी अचानक मोठ्या पावसाला सुरुवात झाली. धरण क्षेत्रात दाजीपूर परिसरात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता. त्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी वाढू लागली. दुपारी पावणेतीन वाजता खासगी जल विद्युतनिर्मिती केंद्रातून १६०० क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला. तीन वाजता एक दरवाजा सुरू झाला. पुन्हा पंधरा मिनिटांत दोन, त्यानंतर पाच मिनिटांत आणखी दोन दरवाजे सुरू झाले. सायंकाळी पाच वाजता महाजनकोच्या वीजनिर्मिती केंद्रातून ४०० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. यावेळी एकूण ९२०० क्युसेक्स विसर्ग सुरू होता. यामुळे नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली. आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच या दिवसात धरणाचे दरवाजे सुरूझाले. आतापर्यंत योग्य प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाची पिके चांगली आली आहेत. भाताची कापणी सुरू झाली आहे. दसरा झाल्यावर या कामांना वेग येणार आहे. मात्र, रविवारच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. घटस्थापनेपासून पाऊस तुरळक प्रमाणात सुरू आहे. मात्र, रविवारी त्याचा जोर वाढला. दसऱ्याच्या कार्यक्रमावरही या पावसामुळे व्यत्यय आला. (प्रतिनिधी)