शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाऊस पुन्हा ‘सैराट’!

By admin | Updated: June 10, 2016 00:49 IST

रस्त्यावर लोट : नागरिकांची त्रेधातिरपीट; ‘सेफ सिटी’चा धुव्वा; पहिल्या पावसातच स्वच्छतेचे वाजले तीनतेरा

कोल्हापूर : शहरात गुरुवारी रात्री आठनंतर पाऊस पुन्हा सैराट झाला. बुधवारी (दि. ८) सायंकाळप्रमाणेच शहरवासीयांची त्रेधातिरपीट उडाली. या मान्सूनपूर्व पावसाने दिवसभर कार्यालयात काम करून घरी परतणाऱ्या लोकांची चांगलीच पंचाईत केली. बुधवारी सायंकाळी कोल्हापूरसह जिल्ह्यालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. त्यामुळे हाच पाऊस तसाच सुरू राहतो की काय असे वाटत होते; परंतु गुरुवारी सकाळी आभाळ स्वच्छ होते. दिवसभर पावसाची कोणतीही चाहूल नव्हती. फक्त उकाडा जाणवत होता. आता पावसाळा सुरू झाला म्हणून लोकांनी पावसाळ्यातील डागडुजीचीही कामे करून घेतली. आता दोन-तीन दिवस पाऊस येणार नाही, असे वाटत असतानाच रात्री आठनंतर पुन्हा आभाळ भरून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. त्यातूनच वाहतूक सुरू राहिली. रेनकोटशिवाय बाहेर पडलेल्या लोकांना चिंब भिजूनच घरी परतावे लागले. पावसामुळे रात्री हवा मात्र थंडगार झाली.शहरातील गटारींतील पाणी नाल्यांद्वारे वाहून जाते; परंतु अनेक ठिकाणचे नाले बांधकाम व्यावसायिकांनी वळविले आहेत. बसंत-बहार टॉकीजजवळचा नाला असाच स्थानिक बिल्डरने वळविला. टेंबलाईवाडी येथील नाला ‘आयआरबी’ने वळविला. अशा घटना घडल्यावर त्याबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या; परंतु तेथील यंत्रणेने त्यांची दखल न घेतल्यानेच पहिल्या पावसात शहराचे तळे झाल्याची तक्रार प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. हे नाले तातडीने रिकामे करून पाण्याचा प्रवाहीपणा सुरू करावा, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.