शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत राज कॅसल हॉटेलवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या शासन निर्बंधांचे उल्लंघन करुन हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी येथील राज कॅसल या रेस्टॉरंट व ...

इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लागू केलेल्या शासन निर्बंधांचे उल्लंघन करुन हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी येथील राज कॅसल या रेस्टॉरंट व बारवर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल अमित दीपक कदम यांनी फिर्याद दिली आहे.

अधिक माहिती अशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग करत हॉटेल राज कॅसल येथे विदेशी दारूची विक्री करत ग्राहकांना हॉटेलात बसवून जेवण दिले जात असल्याची माहिती गावभाग ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तेथे काहीजण मद्यपान व जेवण करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह इजाज कलावंत, इम्रान कलावंत (दोघे रा. पाटील मळा), दीपक केर्ले (रा. नारायणमळा), मुबारक कलावंत (रा. टाकवडे वेस), फैय्याज मुल्ला (रा. पाटील मळा), तौफिक नेजकर (रा. विरशैव बँकेजवळ), मयूर महाद्वार (रा.विक्रमनगर), आकाश नाईक (रा. गणेशनगर), दीपक शेळके (रा. आयबी पेट्रोल पंपाजवळ), अनिलकुमार सरोज (रा. गणेशनगर), आकाश बडे (रा. जवाहरनगर), नागेश मधेला (रा. नारायण मळा) अशा १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.