शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

पाटील कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी रीघ

By admin | Updated: April 3, 2015 01:05 IST

जयसिंगपूर : पृथ्वीराज चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

जयसिंगपूर : शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन करण्यासाठी गुरुवारी दिवसभर जयसिंगपूर येथील निवासस्थानी विविध स्तरातील लोकांची रीघ लागली होती. दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील व कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी मंत्री हसन मुश्रीफ, शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, इचलकरंजीचे आमदार सुरेश हळवणकर यांनी पाटील कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करून गणपतराव पाटील, भाऊ आण्णासाहेब पाटील व पत्नी कृष्णाबाई यांची विचारपूस केली.गणपतराव पाटील यांच्याशी चर्चा करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सा. रे. पाटील यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. आयुष्याच्या शेवटपर्यंत ते कार्य करीत राहिले. त्यांच्या विधानसभा अथवा कारखान्याच्या निवडणुकीवेळी चर्चा करायचे. कॉँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते व पक्षश्रेष्ठींसमोर त्यांचा मोठा दबदबा होता. काम करण्याची हातोटी व कार्यक्षमतेची कॉँग्रेस हायकमांडला माहिती होती. सामान्यांच्या हिताला बाधा न आणता त्यांनी आयुष्यभर सहकारात काम केले. एक चांगला नेता हरपल्याचे दु:ख होत आहे.गुरुवारी दिवसभर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यान्नावर, इचलकरंजी जनता बॅँकेचे अशोक सौंदत्तीकर, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष संभाजीराव पाटील, उद्योगपती बाबूलाल मालू, प्रताप होगाडे, चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे कस्तुरे, चौंडेश्वरी सूतगिरणीचे अध्यक्ष विठ्ठलराव डाके, माजी आमदार काका पाटील (निपाणी), कामगार इंटकचे शामराव कुलकर्णी, सुरेश पाटील (इचलकरंजी), तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज, शाहू कारखान्याचे विजय औताडे, बी. एम. पाटील, प्रदीप पाटील, कुरुंदवाडचे सुनील पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)दत्त कारखाना दुसऱ्या दिवशीही सुन्नचएक आदर्श कारखाना म्हणून ‘दत्त’ची ओळख आहे. या कारखान्याने शिरोळ तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातील शेतकऱ्यांना फार मोठा हातभार लावला आहे. हजारो कामगारांच्या जीवनातही आनंदाचे मळे फुलविले. सा. रे. पाटील यांची एक्झिट सहन न होणारी आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रासह तालुक्यात गुरुवारी दुसऱ्या दिवशीही सन्नाटाच दिसत होता.