शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

रा. चिं. ढेरेंचा कोल्हापूरशी ऋणानुबंध

By admin | Updated: July 2, 2016 00:46 IST

‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ पुस्तक लोकप्रिय : अंबाबाईचे दर्शन, रमेश जाधवांची भेट ठरलेली

कोल्हापूर : संत साहित्य, लोकसाहित्य, मंदिर,  देव-देवतांच्या इतिहासाचे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध होता. त्यांचे ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ हे पुस्तक प्रचंड गाजले. हे पुस्तक वाचले की देवीच्या मूळ स्वरूपाची माहिती मिळते. रा. चिं. ढेरे यांचे अनेकदा कोल्हापूरला येणे-जाणे असे. खंडोबा, तुळजाभवानी, शनिशिंगणापूर अशा अन्य देवस्थानांप्रमाणे त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईवरही प्रचंड अभ्यास केला. मूर्ती वर्णनापासून ते येथील प्रथा-परंपरा, देवीचा इतिहास, या सगळ्याच्या बारीक-सारीक तपशीलांचा अभ्यास करून त्यांनी ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ हे पुस्तक प्रकाशित केले. रा. चिं. ढेरे यांचे हे पुस्तक आणि आणि ग. ह. खरेंचे ‘महाराष्ट्रातील चार दैवते’ ही पुस्तके वाचली की कोल्हापूरच्या अंबाबाईचा पूर्ण इतिहास कळतो. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांच्यावर ते पुत्रवत प्रेम करत. डॉ. जाधव आणि त्यांची भेट सन १९९१ पासूनची. त्यांच्या ‘लोकराजा छत्रपती शाहू’ व ‘लोकमान्य’ ही दोन पुस्तके प्रकाशित होण्यामागे त्यांची प्रेरणा होती अशी आठवण त्यांनी सांगितली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीदिनी प्रकाशित झालेला राजर्षी शाहू गौरव ग्रंथात रा. चिं. ढेरे यांनी शाहू छत्रपती आणि आर्य समाज संबंधांवर लेख लिहिला आणि त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. कोल्हापूरला आले की ते प्रथम अंबाबाईचे दर्शन घेत आणि त्यानंतर डॉ. रमेश जाधव यांची भेट घेत असत. मंदिर व मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांना भेटत. या भेटीत ते अंबाबाई मूर्ती आणि मंदिर प्रकारांवर चर्चा करीत. मराठीतील व्यासंगी आणि शिस्तीचा साहित्यिक म्हणून रा. चिं. ढेरे यांचा उल्लेख करावा लागेल. एखाद्या गोष्टीची खोलात जाऊन माहिती मिळविणे, प्रवास करून त्याचे संदर्भ गोळा करणे हा त्यांचा शिरस्ता होता. मराठी संस्कृती, देव-देवता, प्राचीन मिथके यांच्याबद्दलचे त्यांचे संशोधन मान्यताप्राप्त आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका चांगल्या संशोधकाला मुकला आहे. - सुनीलकुमार लवटे(ज्येष्ठ साहित्यिक)रा. चिं. ढेरे हे फार मोठे संशोधक होते. महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांवर त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके गाजली. ते माझ्यावर पुत्रवत प्रेम करत. माझे दोन ग्रंथ प्रकाशित होण्यामागे केवळ त्यांचे प्रयत्न होते. - डॉ. रमेश जाधव (ज्येष्ठ इतिहास संशोधक)रा. चिं. ढेरेंशी माझी ओळख ‘कोल्हापूरची महालक्ष्मी’ या पुस्तक प्रकाशनानंतर झाली. कोल्हापूरचे नसतानाही त्यांनी अंबाबाई मंदिराचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता. हे पुस्तक लिहून त्यांनी संशोधक, अभ्यासक आणि भक्तांना महत्त्वाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांचा व्यासंग बघून मी थक्क झालो. - उमाकांत राणिंगा (मूर्ती अभ्यासक)