शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

वीज कामगारांचे प्रश्न अधिवेशनात मांडणार

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

भालचंद्र मुणगेकर : ‘बहुजन विद्युत अभियंता फोरम’चे राज्यस्तरीय अधिवेशन

कोल्हापूर : वीज कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, पगारवाढ हे प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडणार आहे, अशी ग्वाही राज्यसभेचे खासदार डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी दिली़ बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचे द्विवार्षिक चौथे राज्यस्तरीय अधिवेशन आज, रविवारी दसरा चौक येथील मैदानावर झाले़ अधिवेशनाचे उद्घाटन डॉ़ मुणगेकर यांच्या हस्ते झाले़ यानंतर ते ‘भारतीय कामगार कायदे व त्यांची अंमलबजावणी’ या विषयावर बोलत होते़ अध्यक्षस्थानी बहुजन फोरमचे अध्यक्ष शिवाजी वायफळकर होते़ डॉ़ मुणगेकर म्हणाले, महाराष्ट्र वीज मंडळाचे तीन कंपन्यांत विभाजन करण्यास मी विरोध केला होता़ तत्कालीन महाराष्ट्र सरकारने विजेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेले नव्हते़ वीजनिर्मिती करताना हा व्यवसाय आतबट्ट्याचा होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली नाही़ वीज ही अत्यावश्यक गरज असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वच घटकांबाबत व्यापक दृष्टिकोनाची गरज आहे़ प्रा़डॉ़ राजेंद्र कुंभार, आमदार सुजित मिणचेकर, ‘महावितरण’चे मानव संसाधन कार्यकारी संचालक डॉ़ मुरहरी केळे आदींनी मनोगत व्यक्त केले़ अधिवेशनातील ठराववीजखात्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेतनगटनिहाय अधिसंख्य पदे निर्माण करून सामावून घेण्यात यावे.वर्ग तीन व चारची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत तिन्ही कंपन्यांमध्ये सुसूत्रता आणावी, गुणवत्तावाढीसाठी कंपनीच्या प्रशिक्षण संस्थेतर्फेच कर्मचारी व अभियंते यांना प्रशिक्षण द्यावे, सोयीच्या किंवा नजीकच्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करावी, तिन्ही कंपन्यांमधील ठेकेदारी पद्धती रद्द करावी, खासगी उद्योगांना, सहकार क्षेत्राला सहकार कायदा लागू करण्यात यावा.