शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’

By admin | Updated: June 10, 2016 00:13 IST

शिक्षकांचे भजन : अनुदानासाठीच्या आंदोलनाचा नववा दिवस; आज दशविधी

कोल्हापूर : ‘हा तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’, ‘हे भोळ्या शिक्षका’ अशा गीतांवर टाळांचा गजर, सूरपेटीच्या तालावर प्रतीकात्मक भजन करून अनुदान मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी गुरुवारी आंदोलन केले. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज, शुक्रवारी दहा वाजता पंचगंगा नदीघाटावर आंदोलनकर्ते शासनाला दशविधी घालणार आहेत.राज्यातील अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्गतुकड्यांना शासनाकडून त्वरित वेतन व अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी गुरुवारी शिक्षकांनी आपल्या मागण्यांबाबत शासनाला जागे करण्यासाठी प्रतीकात्मक भजन केले. यात त्यांनी टाळांचा गजर आणि सूरपेटीच्या तालावर ‘हा तावडेंचा कान्हा, फसवितो आम्हा’, ‘हे भोळ्या शिक्षका, आवड तुला शिकवायची, शाळेला जायाची’ अशा गीतांच्या माध्यमातून शासनाचा निषेध केला. आंदोलनात माजी आमदार भगवानराव साळुंखे, कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे, महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संतोष आयरे, राजेंद्र कोरे, मच्छिंद्र जाधव, प्रेमकुमार बिंदगे, शिक्षकेतर संघटनेचे (शाहूवाडी) एम. के. पोवार, आदी सहभागी झाले होते. अनुदान देण्याचा शासकीय आदेश निघेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाच्या नवव्या दिवशी आम्ही प्रतीकात्मक भजन आंदोलन करून शासनाला अनुदान देण्याबाबत सद्बुद्धी द्यावी, असे देवाला साकडे घातले आहे. आंदोलनातील पुढील टप्पा म्हणून आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजता पंचगंगा नदीघाटावर शासनाचा दशविधी घालून आंदोलन केले जाणार असल्याचे कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)दोन दिवसांत निर्णयअनुदानाच्या मागणीबाबत शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा केली असल्याचे माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी सांगितले. ते म्हणाले, अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असून, दोन दिवसांत अधिकृत निर्णय व शासकीय आदेश होण्याची शक्यता आहे.