शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांचा ‘काम बंद’चा पवित्रा

By admin | Updated: January 29, 2015 00:33 IST

एम.डीं.चा निषेध : कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कर्मचाऱ्यांनी ‘काम बंद’चा इशारा दिला आहे. संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी चर्चेसाठी गेलेल्या कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधींना अपमानास्पद भाषा वापरत केबिनमधून हाकलल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी घाणेकर यांच्या विरोधात आज घोषणा बाजी केली. ‘गोकुळ’ कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत संचालक मंडळाने महिन्यापूर्वी निर्णय घेतला होता. सरासरी २१०० रुपये पगारवाढ कर्मचाऱ्यांना दिली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी आज युनियनचे प्रतिनिधी सदाशिव निकम हे सहकाऱ्यांसमवेत कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी हा प्रकार घडला.‘गोकुळ’साठी  ३९ ठराव दाखलकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी (गोकुळ) आज, बुधवारी ३९ ठराव दाखल झाले. सर्वाधिक करवीर तालुक्यातून १६ ठराव दाखल झाले असून आजअखेर १०३ ठराव दाखल झाले आहेत. तालुकानिहाय आज दाखल झालेले ठराव असे- करवीर- १६, चंदगड -२, भुदरगड -३, गडहिंग्लज- ५, हातकणंगले -१, शाहूवाडी-१, गगनबावडा -७, राधानगरी -२.‘गोकुळ’मध्ये आज अशा प्रकारची काहीच घटना घडलेली नाही, कोणाशी वादही झालेला नाही तर प्रतिक्रिया काय द्यायची ? - डी. व्ही. घाणेकर (कार्यकारी संचालक, ‘गोकुळ) ‘त्या’ सुपरवायझरवर होणार कारवाईकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ संचालकांचे ठराव गोळा करणाऱ्या संघाच्या सुपरवायझर व अन्य कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी दिले. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी त्यासंबंधीची लेखी तक्रार सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे केली होती. संघाचे काही संचालक हे संघाचे कर्मचारी कमी व संचालकांचे कार्यकर्ते म्हणूनच राबत असतात. त्यांचा दूध संस्थेशी दैनंदिन संबंध असतो. त्यामुळे आपल्या संचालकास मदत करू शकेल अशाच व्यक्तीच्या नावे दूध संस्थेचा ठराव व्हावा यासाठी सुपरवायझर प्रयत्न करतात. त्यासाठी काहीवेळा दहशतही दाखवली जाते तसाच प्रकार सध्या सुरू असल्याने विरोधी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी त्यासंबंधीची तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. त्याची दखल घेऊन संघाच्या प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.त्यासंबंधी घाणेकर यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘गोकुळ’ची निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हावी यासाठी या संस्थेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष निवडणुकीत सहभाग असता कामा नये, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आज सहकार आयुक्तांनीही फोन करून एकाही व्यक्तीची निवडणूक प्रक्रियेबद्दल तक्रार येता कामा नये याची दक्षता घ्यावी, अशा सूचना केल्या.