शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पुण्याई - भाग ३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

' काका पैसे?' ‘बाईनी दिलेत.’ ‘तुम्हाला दूध आणून देतो,' म्हणत शिपाई गेला. नीलिमानं चहा ठेवला. दूध येताच तिनं शिपायाला ...

' काका पैसे?'

‘बाईनी दिलेत.’

‘तुम्हाला दूध आणून देतो,' म्हणत शिपाई गेला. नीलिमानं चहा ठेवला. दूध येताच तिनं शिपायाला दिला.

' काका, बाई, अशा अचानक?'

'त्यांचे मालक गावाकडं असतात. निरोप आला की त्या जातात. आणखी आणून देऊ का? उद्या येतो.'

शिपायाच्या मदतीने घर लावण्यात दुपार संपली. नीलिमाला शिपायाचं कौतुक वाटलं. जाताना नीलिमाने शिपायासमोर काही नोटा धरल्या.

' या घ्या...'

'ताई, आमच्या मॅडमच्या तुम्ही मैत्रीण. तुमच्याकडनं पैसे नाही घेणार. वर्षभरात मॅडम रिटायर होणार. त्यानंतर तुम्हीच आम्हाला मॅडमच्या जागेवर तेव्हा पैसे देऊन परकं करू नका. केव्हाही बोलवा. भाऊ म्हणून येईन.'

शिपाई गेल्यावर नीलिमा विचार करत बसली, 'आपण किती भाग्यवान! या शाळेने केवळ नोकरी दिली नाही; तर बहीण-भाऊ दिले हे सुमनताईमुळं... .सुमनताईची आठवणीबरोबर शिपायाचे शब्दही आठवले....म्हणजे सुमनताईचा सहवास... नीलिमाच्या डोळ्यांत पाणी आलं...

सकाळी घराबाहेरच आवार स्वच्छ करत असतानाच, 'येऊ का चहा प्यायला?'

सुमनताईचा आवाज कानांवर येताच हातातला झाडू खाली ठेवतच नीलिमानं मान वळवली.

' सुमनताई...'

तिला झालेला आनंद सुमनताईंनी ओळखला.

'चल ना घरात... चहा काय... जेवणही इथंच... चल.'

सुमनताईला नीलिमा आपल्या घरात घेऊन आली.

' छान लावलंस ग घर.'

' शिपाईकाकांनी खूप मदत केली. मी तुझ्यावर रागावले आहे. सुमनताईच्या हातात चहाचा कप देत नीलिमा म्हणाली.

खरोखरच सुमनताई नीलिमाबरोबर तिथं जेवल्या. तिथूनच तिच्याबरोबर शाळेत निघाल्या.

' सुमनताई, आजचा मुक्कामही माझ्या घरीच बरं का. तुझ्याशी मला खूप बोलायचं आहे.' नीलिमाकडं बघत सुमनताईंनी मान डोलावली.

रात्रीची जेवणं झाली. दोघी निवांतपणे सतरंजीवर बसल्या.

' सुमनताई, मी तुझ्यावर रागावले आहे. तुझी नोकरी एकच वर्ष आहे, हे मला शिपाई काकांकडून समजलं... तुझ्याबद्दल तू मला काही सांगितलं नाहीस म्हणजे तू...' नीलिमाचे डोळे पाणावले.

'तसं काही नाही. तुला वाईट वाटेल म्हणून मी बोलले नाही. मी अचानक गावाकडं गेले. तुला एकटीला सोडून जाताना मला वाईट वाटलं म्हणून मी गप्प होते. तू आपली वाटतेस म्हणूनच मी....'

पाण्यानं भरलेले डोळे पुसत सुमनताईनी सांगितलं.' सुमनताईंचे मिस्टरही शिक्षक होते. चार वर्षांपूर्वी निवृत्त झाले आणि गावाकडची शेती बघू लागले. तिथं त्यांच्या गोतावळ्यात ते रमले. सुमनताई मधनंमधनं जात होत्या. सुमनताईना दोन मुलं. मुलगा शिकून कोल्हापूरला नोकरीला लागला. नुकतेच त्याचे लग्न झाले होते. मुलगी मुंबईला नोकरीला होती. तिचं फारसं येणं-जाणं नव्हतं.

' नीलिमा, मला गोष्टींची हौस ! पण मुलानं रजिस्टर लग्न केलं. सुनेला सणवार आवडत नाहीत. मी तिला म्हटलं, बाकीचं राहू दे. मंगळागौर तरी... तर ती मला म्हणाली, ‘माझ्या मंगळागौरी तुम्हीच पूजा...’ सुमनताई स्वत:ला आवरू शकल्या नाहीत; पण त्या बोलत होत्या... मुलीच्या लग्नात हौस पुरवीन म्हटलं तर ती लग्नाबद्दल बोलूच देत नाही. आता तुझ्या लग्नात तरी.'

' माझं लग्न?'

' हो. मी निवृत्त होण्यापूर्वी तुझा संसार थाटून देणार. माझ्या मुलीचं मला माहीत नाही; पण तुझं संसारचित्र मात्र मला डोळ्यांसमोर दिसतं आहे.'

'ताई, माझ्यासारख्या मुलीबरोबर कोण लग्न करणार?'

'बरेच जण मला, बाई, आमच्या मुलासाठी चांगली मुलगी बघा,’ असं सांगत असतात. त्यातील एक-दोन माझ्या अगदी नजरेसमोर आहेत. मी चौकशी करते. काळजी करू नको. तुझं मत विचारात घेतल्याशिवाय मी काही करणार नाही.'

नीलिमाचं लग्न ठरलं तेव्हा नीलिमापेक्षा सुमनताईंनाच अधिक आनंद झाला. हौसेनं त्यांनी लग्नाची तयारी केली. मुलगा सातारलाच एल.आय.सी.मध्ये नोकरीला होता. त्याचे आईवडील सातारजवळ किनई येथे राहत होते. परिस्थिती बेताची होती; पण सुमनताईनी सर्व व्यवस्थित केले. लग्नानंतर मुलगी सासरी जाते; पण कौतुकानं नीलिमालाच तिच्या घरी आणलं आणि सुमनताई निश्चिंत झाल्या. नीलिमाचा सुखाचा संसार बघतच निवृत्त झाल्या आणि गावाकडं म्हातारपणीचा संसार करण्यासाठी नवऱ्याकडं गेल्या.