शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुण्याई - भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:23 IST

'मिस कॉल...सात मिस कॉल..तेही सुमनताईचे...नीलिमा चांगलीच गोंधळली. आठ दिवसांपूर्वीच दोघींनी मोबाईलवर मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून ...

'मिस कॉल...सात मिस कॉल..तेही सुमनताईचे...नीलिमा चांगलीच गोंधळली. आठ दिवसांपूर्वीच दोघींनी मोबाईलवर मनसोक्त गप्पा मारल्या होत्या. हातातलं पुस्तक बाजूला ठेवून नीलिमा उठली. स्वयंपाकघरात जाऊन भांडभर पाणी पिऊन ती बाहेर आली आणि मगच तिनं कॉटवरचा मोबाईल उचलला

' हॅलो...'

नीलिमा एवढंच बोलली...सुमनताईनं तिला पुढं बोलूच दिलं नाही.

'किती फोन केले गं.....कुठं गेली होतीस...कोल्हापूरला येतीस का? मला तुझ्याशी बोलावंसं वाटतंय...'एवढं बोलून नीलिमाच्या उत्तराची वाटही न बघता सुमनताईने मोबाईल बंद केला.

'कशासाठी बोलावलं असेल सुमनताईने? मोबाईल लगेच का बंद केला असावा?'

एक चांगली कथा वाचायला मिळाली, या आनंदात असतानाच मैत्रिणीच्या आलेल्या अशा फोनने नीलिमा थोडी विचारातच पडली.

'काय करावं? जाऊन यायला हवं; पण यावेळी जाऊन परत कधी यायचं..? सातारा-कोल्हापूर हे अंतर काही कमी नव्हतं आणि सुमनताईकडं किती वेळ लागेल, ते सांगता येत नाही. विचारात गुंतलेल्या नीलिमाच्या कानावर परत मोबाईलची रिंगटोन आली...' सुमनताई असणार..स्वत:शीच बोलत नीलिमाने मोबाईल उचलला..

'सुमनताई आज नाही, पण उद्या सकाळी नक्की निघते...'एवढं बोलून नीलिमानं मोबाईल बंद केला.

नीलिमा मोबाईल बंद करू शकली; पण सुमनताईबद्दलच्या विचारांनी तिच्या मनात झालेली गर्दी...त्याचं काय? काळ्याकुट्ट ढगांनी आकाश गच्च भरून ओथंबावं..त्यातल्या कोणत्या ढगांनी कुठं कसं कोसळावं, हे ना ढगाला कळतं ना आकाशाला, तसंच काहीसं नीलिमाच्या मनात गर्दी केलेल्या विचारांचं झालं होतं! त्यातल्यात्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे नीलिमा एकटीच घरात होती. तिचे मिस्टर ऑफिसच्या कामासाठी पुण्याला गेले होते. आठ दिवस तरी ते येणार नव्हते. सुमनताईचा अर्धवट फोन झाल्याने ती अस्वस्थ झाली होती. हो...अस्वस्थ होण्याइतका त्यांच्या मैत्रीचा पीळ घट्ट होता. त्यांची मैत्री अजबच होती....दोघींच्या वयात जवळजवळ दहा वर्षांचं अंतर होतं. सुमनताई अतिशय धार्मिक आणि देवाचं फारसं वेड नसलेली नीलिमा! नंतर सुमनताईंच्या सहवासामुळं तिच्यात थोडा बदल झाला; पण सुमनताईइतकं ती काही करत नसे. जेव्हा दोघींची ओळख झाली, तेव्हा नीलिमा अविवाहित आणि सुमनताई विवाहित होती. तशी त्यांची मैत्री नीलिमाच्या दृष्टीनं चांगल्या अर्थानं एक अपघातच ठरला होता. नीलिमाला आपल्या नोकरीच्या इंटरव्ह्यूचा दिवस आठवला.

सातारच्या एका शाळेत नीलिमा इंटरव्ह्यूसाठी आली होती. शाळेला सुटी असल्याने इंटरव्ह्यूसाठी आलेल्यांशिवाय शाळेत कुणी नव्हतं. नेमणुकीबद्दल नंतर कळविणार असल्याची नोटीस बोर्डवर लिहिली होती त्यामुळं इंटरव्ह्यू होतील तसे एकेकजण आपापल्या गावी जात होते. गाडी न मिळाल्यानं नीलिमाला पोहोचायला उशीर झाला, त्यामुळं तिचा नंबर शेवटी आला होता. इंटरव्ह्यू होईपर्यंत दुपारचे दोन वाजले होते. गाडी पकडण्यासाठी नीलिमा गडबडीनं मुख्याध्यापकांच्या रूममधून बाहेर पडत असतानाच एक बाई मुख्याध्यापकांच्या रूमजवळून जात होत्या मुख्याध्यापकांनी त्याना बोलावून काहीतरी सांगितले तशा त्या बाई पटकन नीलिमाजवळ आल्या.

'कशा जाणार आहात?'

'रेल्वेनं..'

मिरजेला जाणारी रेल्वे चार वाजता आहे. माझ्या घरी थोडी विश्रांती घ्या आणि मग जा..'

नीलिमालाही विश्रांतीची गरज असल्यानं ती त्यांच्याबरोबर गेली.

'ये गं..'दाराचं कुलूप काढून आत जात त्या नीलिमाला म्हणाल्या. त्यांच्यापाठोपाठ नीलिमा घरात गेली.

'तिकडं बाथरूम आहे ...साबण वगैरे तिथंच आहे...'.

बाथरूममधून नीलिमा बाहेर आली तेव्हा बाई दोघींना जेवायला वाढत होत्या.

'वाटलं ना फ्रेश? तू मला माझ्या मुलीसारखी वाटतेस म्हणून अगं म्हणते. चालेल ना?'

'मला मुलीसारखंच माना मला; मात्र तुम्ही माझी मोठी बहीण वाटता. खूप छान वाटलं पण'

खरंच याची गरज होती. हे तुम्ही?

'हे जेवण..अगं माझंही जेवण झालं नाही. सकाळी संस्कृतचे जादा तास ठेवले होते. तसं थोडं खाल्लं होतं. आता तुझ्याबरोबर थोडं खाते. सावकाश जेव. गाडीला वेळ आहे. तुला ही नोकरी मिळेल, असं वाटतंय. सर खूश आहेत तुझ्यावर. तू आलीस की आपण...तुझं नक्की कळलं की मी तुझ्यासाठी खोली बघेन...'

किती केलं सुमनताईंनी माझं..' त्या प्रसंगाच्या आठवणीनं नीलिमाचे डोळे पाणावले.

नोकरीच्याबाबतीतला सुमनताईंचा अंदाज खरा ठरला. नीलिमाला नोकरी मिळाली.

'तुला जर ही नोकरी मिळाली, तर गरजेपुरतं सामान घेऊन इथंच ये. मग आपण बघू या.' सुमाताईंनी सांगितल्याप्रमाणं अगदी अत्यावश्यक सामान घेऊन नीलिमा कऱ्हाडहून सातारला आली. रिक्षाचा आवाज येताच पटकन बाहेर येऊन सुमाताईंनी हसतमुखाने स्वागत केलं.

'आज हजर व्हायचंय ना...साडेअकराला शाळा आहे. जेवण करून अकराला बाहेर पडू या. दुपारचा डबा घेते. मधल्या सुटीत आम्ही एकत्र डबा खातो. आज तुला शाळेतलं बरंचसं समजेल. हे बघ घरी आल्यावर आपण बहिणी, शाळेत सहशिक्षका...'

'समजलं, नीलिमानं हसत उत्तर दिलं.

सुमाताई, शाळा पटकन आपली वाटली. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांच्या ओळखी करून दिल्या. एक-दोन शिक्षक सोडले, तर प्रत्येकाच्या बोलण्यात, 'सुमा मॅडमबरोबर आहात ना, कोणतीच अडचण येणार नाही..,'ते ऐकून आपल्याला किती चांगली मैत्रीण मिळाली, याची नीलिमाला कल्पना आली. नीलिमाच्या नोकरीची सुरुवात खूप चांगली झाली. शाळा सुटल्यानंतर शिक्षकांशी गप्पा मारत मारतच सुमनताईंच्याबरोबर नीलिमा बाहेर पडली...चार पावलं जाताच सुमाताई थांबल्या.' त्या बागेत जाऊ या..' म्हणत नीलिमाला घेऊन त्या बागेत आल्या. बैस या बाकावर म्हणत त्या बागेतल्या दु्र्वा काढायला लागल्या. 'मी करू का मदत..' नीलिमानं विचारताच, 'तू तिकडच्या झाडावरच्या उद्या उमलतील अशा कळ्या काढ..'सुमाताईंच्या दुर्वा काढून होईपर्यंत नीलिमाने कळ्या काढल्या. दोघी घरी आल्या.