शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहू चरित्रा’च्या हिंदी आवृत्तीचे रविवारी प्रकाशन

By admin | Updated: June 23, 2016 01:05 IST

शाहू जयंती : शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन सोहळा

कोल्हापूर : ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या राजर्षी शाहू महाराज चरित्रग्रंथाच्या हिंदी आवृत्तीचे रविवारी (दि. २६) प्रकाशन होणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी साडेदहा वाजता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या ग्रंथाचे प्रकाशन होईल. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे प्रमुख उपस्थित असतील. कोल्हापुरातील महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी या संस्थेमार्फत डॉ. जयसिंगराव पवार संपादित राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हा विविध भाषांमध्ये प्रसिद्ध करण्याचा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत संबंधित ग्रंथाचा हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. अनुवादाचे हे काम हिंदी विभागप्रमुख डॉ. पद्मा पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)शाहू जयंतीनिमित्त रविवारी रॅलीकोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. २६) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून रॅलीचे आयोजन केल्याची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी दिली आहे. रविवारी सकाळी ८ वाजता दसरा चौक येथून रॅलीस सुरुवात होईल. शाहूराजांच्या छायाचित्राचे प्रदर्शनकोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने रविवार (दि. २६)पासून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रे व कागदपत्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवन येथे पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची सूत्रे हाती घेतल्यानंतर समाजाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावला. अशा या महापुरुषाचे चरित्र कथन करणाऱ्या इतिहासावर या प्रदर्शनाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे.