शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अणुऊर्जेबाबत लोकशिक्षणाची गरज

By admin | Updated: June 26, 2015 00:58 IST

शिवराम भोजे : राजकीय आडमुठेपणा, लोकांमधील अज्ञानापोटी अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध--राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : वाढत्या लोकसंख्येमुळे ऊर्जेच्या गरजाही दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अणुऊर्जेसारख्या मुबलक आणि विश्वसनीय ऊर्जा स्रोताची आज नितांत आवश्यकता आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या तुलनेत अणुप्रकल्पांतून किफायतशीर किमतीमध्ये आणि कमी प्रदूषणामध्ये ऊर्जा उपलब्ध होते; पण राजकीय आडमुठेपणा आणि लोकांमधील अज्ञानापोटी अणुऊर्जा प्रकल्पांना विरोध होत आहे. त्यामुळे अणुऊर्जेबाबत लोकशिक्षणाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शिवराम भोजे यांनी गुरुवारी व्यक्त केले. येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘जैतापूरचा अणुप्रकल्प’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले होते.डॉ. भोजे म्हणाले, आज कोळसा, जलविद्युत व डिझेल आदींपासून ऊर्जानिर्मिती केली जाते; परंतु हे ऊर्जानिर्मितीच्या वस्तूंचे साठे येत्या काही वर्षांत संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या ऊर्जास्रोतांना अणुपासून ऊर्जानिर्मिती हाच शाश्वत आणि मुबलक ऊर्जेचा पर्याय आहे. पारंपरिक ऊर्जास्रोतांतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेपेक्षा कैक पट ऊर्जा अणुभट्ट्यांमधून निर्माण करता येते. भारतात आजही ५९ टक्के वीज ही कोळशापासून निर्माण केली जाते. या ऊर्जास्रोतांमुळे प्रदूषणाची समस्या तीव्र होते; पण अणुभट्ट्यातून अतिशय नगण्य कचरा तयार होतो. शिवाय हा कचरा जमिनीमध्ये ३०० वर्षे गाडून ठेवण्याची सोय केलेली असते. त्यामुळे हा कचरा पर्यावरणामध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जपानमधील फुकुशिमा अणुभट्टीच्या स्फ ोटाच्या घटनेचा संदर्भ देत आज जैतापूर प्रकल्पाला विरोध केला जात आहे; पण कोणताही अणुप्रकल्प उभारला जात असताना भूकंप व भूकंपाची तीव्रता, चक्रीवादळ, तापमान, वाऱ्याचा वेग, समुद्राच्या लाटांची उंची, दहशतवादी हल्ले, वीज किंवा अनपेक्षित अपघात गृहीत धरूनच त्याची रचना केली जाते. जैतापूरमधील अणुप्रकल्पामध्ये या सर्व बाबींचा विचार केला आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे, असे मतही डॉ. भोजे यांनी व्यक्त केले. डॉ. भोजे म्हणाले, प्रकल्पांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य तो मोबदला देणे गरजेचे आहे, पण महसूल व्यवस्था भ्रष्ट असल्यामुळे आपल्याकडे प्रकल्पग्रस्तांना मोबदला वेळेवर मिळत नाही. कोयना प्रकल्पग्रस्त हे त्याचे उदाहरण आहे. प्रकल्पग्रस्तांना आरोग्य, शिक्षण, वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. बऱ्याचदा तत्त्वहीन राजकारण्याकडून पैसे उकळण्यासाठी एखाद्या प्रकल्पाला विरोध केला जातो, ही बाब घृणास्पद आहे. अध्यक्षीय भाषणात वसंत भोसले म्हणाले, विजेची गरज आणि उत्पादन यामध्ये गफलत झाल्यामुळे एन्रॉन बुडाला. ऊर्जेची आवश्यकता आणि उत्पादन याबाबत योग्य नियोजन करून त्याप्रमाणे आर्थिक तरतुदीची गरज प्रकल्पांसाठी आवश्यक आहे. प्रकल्पाबाबत लोकांना विश्वासात घ्यायला कमी पडता कामा नये. शहरांचा विकास करताना पायाभूत सुविधांबाबत शास्त्रशुद्ध आणि नेमके धोरण आवश्यक आहे. चुकीच्या निर्णयामुळेच प्रकल्पासाठी खर्च झालेली किंमत आणि संबंधित कंपनीकडून होणारी वसुली यात करोडोंचा फरक आढळतो, ही बाब कोल्हापूरने टोलच्या रूपाने अनुभवली आहे. त्यामुळे महत्त्वाकांक्षी प्रकल्पांशी खेळण्याचा मूर्खपणा थांबवला पाहिजे. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी )