शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीएम’ची ‘दिलबहार’वर मात

By admin | Updated: May 21, 2016 01:00 IST

घारगे स्मृतिचषक : पाटाकडील-बालगोपाल उद्या अंतिम सामना

कोल्हापूर : पाटाकडील तालीम मंडळ (अ)(पीटीएम)ने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ (अ)चा अटीतटीच्या सामन्यात १-० असा पराभव करीत अवधूत घारगे स्मृतिचषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या, रविवारी ‘पाटाकडील अ’ची लढत बालगोपाल तालीम संघाशी होणार आहे. शाहू स्टेडियम येथे शुक्रवारी पाटाकडील (अ) व दिलबहार (अ) यांच्यात स्पर्धेतील उपांत्य सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून दिलबहार (अ)च्या अनिकेत तोरस्कर, सनी सणगर, जावेद जमादार, गोन्साल्वीस, राहुल तळेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत पाटाकडील (अ) च्या गोलक्षेत्रात धडक मारीत गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग गोलरक्षक शैलेश पाटील व बचावफळीने त्यांच्या गोल करण्याच्या संधी परतावून लावल्या. १९ व्या मिनिटास दिलबहार(अ) च्या गोलक्षेत्रात पाटाकडील (अ)च्या वृषभ ढेरे याने फ्री किकवर मारलेल्या चेंडूवर नियंत्रण करीत अक्षय मेथे-पाटीलने गोल करण्यास सरसावला. दरम्यान, चेंडू गोलजाळ्यात जाणार इतक्यात ‘दिलबहार’च्या नीलेश जाधवने चेंडू अवैधरीत्या हाताने बाहेर काढला. मुख्य पंचांनी पाटाकडील (अ) ला पेनल्टी बहाल केली. यावर अक्षय मेथे-पाटीलने अचूक गोल नोंदवीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात काही काळ ‘दिलबहार’ने चढाया केल्या. उत्तरार्धात एका गोलने पिछाडीवर असलेल्या दिलबहार (अ) संघाने आक्रमक पवित्रा घेत सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. दिलबहार (अ)च्या सनी सणगर, जावेद जमादार, सचिन पाटील यांचे प्रयत्न पाटाकडील (अ)च्या बचावफळीने वारंवार फोल ठरविले. अखेरच्या काही वेळात दोन्ही संघांचा खेळ आक्रमक व वेगवान झाला. दोन्हीकडून आक्रमण-प्रतिआक्रमण झाले. पाटाकडील (अ) च्या ओंकार जाधवने दिलबहारच्या गोलक्षेत्रात मारलेला चेंडू परतविण्याचा प्रयत्नात दिलबहार (अ) चा बचावपटू अभिजित शिंदे याचा फटका उलट दिशेने जात स्वयंगोल होता-होता वाचला. पाटाकडील (अ)चा गोलरक्षक शैलेश पाटील याने दिलबहार (अ) च्या सचिन पाटील, जावेद जमादार, सनी सणगर, अनिकेत जाधव, संग्राम थोरवडे यांचे गोल करण्याचे प्रयत्न वारंवार हाणून पाडले. अखेरच्या क्षणांत दिलबहार (अ) च्या सचिन पाटीलला गोल करण्याची सोपी संधी मिळाली. मात्र या संधीचा लाभ त्याला उठविता आला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत दोन्ही संघांकडून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा खेळ झाला. १-० अशी आघाडी कायम राखत हा सामना पाटाकडील (अ) ने जिंकत स्पर्धेतील अंतिम फेरी गाठली. उद्या, रविवारी अंतिम फेरीत पाटाकडील (अ)चा सामना बालगोपाल तालीम मंडळाशी होणार आहे.